अलिकडच्या काही दिवसात बिबट्याचा वावर नागरी वस्तीत वाढलेला दिसुन येत आहे. दौड तालुक्यातील बहुतांश गावा मध्ये मोठया प्रमाणात ऊसाचे उत्पन्न घेतले जाते, त्यामुळे जंगली प्राण्यांचा वावर या भागात जास्त आहे. वन विभाग अनेक ठिकाणी पिंजरे लावतात परंतू त्यात बिबट्या सारखे जंगली प्राणी अडकण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.
जंगली प्राणी शिकारीच्या शोधात नागरी वस्तीत शिरकाव करु लागले आहेत, गावातील पाळीव प्राण्यांवर, माणसांवर हल्ला करत आहेत. पाळीव प्राण्यांना देखील बिबट्या पासून धोका निर्माण झाला आहे.
दौंड तालुक्यातील कडेठाण गावातील महिला नामे लता बबन धावडे वय वर्ष 45 या शेतामध्ये काम करत असताना बिबट्याने पाठीमागून येऊन त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना उसाच्या पिकामध्ये फरपटत नेले, या प्रकारामध्ये लता बबन धावडे यांचा मृत्यू झाला असून घटनेनंतर गावातील नागरिकांना याची माहिती मिळतात त्यांनी रानात धाव घेतली परंतु बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
दौंड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा सुळसुळाट झाला असून वन विभागाने यावर काहीतरी चांगल्या उपाययोजना कराव्यात अशी सर्वत्र चर्चा होत आहे, वनविभाग बिबट्याचा जिथे वावर आहे अशा गावांमध्ये पिंजरे लावतात परंतु पिंजऱ्या मध्ये बिबट्याचे अडकण्याचे प्रमाण खूपच कमी असलेले दिसून येत आहे , त्यामुळे नवीन अत्याधुनिक पद्धतीचा वापर वन विभागाने करून बिबट्यांना जेरबंद करावे अशी विनंती नागरिकांनी केली आहे.
आज झालेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे, आणि वनविभागाच्या कामगिरी विषयी नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे... बिबट्याचा वावर आहे अशा गावांमध्ये सर्वत्र नागरिक आपली सुरक्षितता घेत आहेत परंतु जर बिबट्याच्या हल्ल्याचे असे प्रकार दिवसा घडू लागले तर नागरिकांमध्ये अजून भीतीचे वातावरण निर्माण होईल त्यामुळे गोरगरीब कष्ट करून खाणाऱ्या व्यक्तींन वरती उपासमारीची वेळ येईल त्यामुळे प्रशासनाने आणि वन विभागातील अधिकाऱ्यांनी काहीतरी अत्याधुनिक प्रणाली वापरून काहीतरी शक्कल लढवून उत्कृष्ट प्रकारच्या उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांकडून विनंती केली जात आहे.