पुणे जिल्ह्यातील कडेठाण (यवत) येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबाला एक रकमी आर्थिक मदत मिळून देण्यासाठी जुन्नर शेतकरी संघटना युवा अध्यक्ष सचिन थोरवे करणार आंदोलन
पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड शिरूर सह दौंड या ठिकाणी देखील बिबट्याचे मानवावर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत असून सरकार त्याबाबत कुठलीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही.
नरभक्षक बिबटे एकावरती हल्ला केल्यानंतर ते त्याच ठिकाणी दबा धरून बसतात आणि अनेक नागरिकांवरती हल्ले करतात आणि त्यामध्ये निष्पाप नागरिकांचे बळी गेल्याची घटना जुन्नर तालुक्यामध्ये अनेक वेळा घडली असून त्या नागरिकांना न्याय देण्यासाठी जुन्नरचे विद्यमान आमदार शरद सोनवणे देखील मागील काळात आळेफाटा या ठिकाणी आंदोलन केले होते,
त्यानंतर जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने देखील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास एक कोटी रुपये नुकसान भरपाई मिळावी त्याचप्रमाणे वन्यजीव प्राणी संरक्षण करण्यात बदल करण्यात यावा लांबून तीन चार किलोमीटर वर लहान मुले शाळेत जातात त्यांच्यावर देखील बिबट्यांचे हल्ले होत असल्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाने त्यांना जाण्या येण्यासाठी मोफत ची सेवा उपलब्ध करून द्यावी अशा अनेक मागण्यासाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्या ंसमवेत जुन्नर तालुका युवा आघाडी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरवे यांनी जुन्नर नारायणगाव रस्त्यावर जय हिंद कॉलेज जवळ कुरणगाव हद्दीत अमरण उपोषण देखील केले होते.
रात्री पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी एका गरीब कुटुंबातील महिलेवर बिबट्याने हल्ला केला आणि त्या त्या महिलेला आपला जीव गमवावा लागला असल्याची बातमी भरारी न्यूज कडून प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर सुंदर शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सचिन थोरवे यांनी दौंडचे तहसीलदार त्यांच्याशी फोन द्वारे संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तेथील वनविभागाचे काळे साहेब यांचा नंबर देऊन त्यांच्याशी संपर्क करा असे सांगितले .
वन विभागाचे आर एफ ओ काळे यांच्याशी रात्री साडेदहाच्या दरम्यान संपर्क करून घटनेची सर्व माहिती थोरवे यांनी घेतली त्याच प्रमाणे मृत्युमुखी पडलेल्या महिलेला वन विभागाकडून जास्तीत जास्त एक रकमी रक्कम मिळावी अशी मागणी देखील शेतकरी संघटनेने काळे यांच्याकडे केली आहे. तेथील कुटुंबाशी संपर्क केला असता त्यांचे पुतणे तेथील उपसरपंच म्हणून कडवटणे या गावात काम पाहतात त्यांनी देखील वन विभागावरती नाराजी व्यक्ती केली असून रात्री त्यांचा मृतदेह सविच्छेदनासाठी पुणे येथे पाठवला होता परंतु सकाळी सात वाजेपर्यंत देखील त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे पीएम होण्यास उशीर होत असल्याने नातेवाईकांना थंडी वाऱ्यात रात्र मोठ्या मुश्किलीने काढावे लागले असून हा देखील येथील दवाखाना प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला असून त्यावर उपसरपंच यांनी नाराजी व्यक्त केली .
मृत महिलेच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी त्याचप्रमाणे सरकारला जाग आणण्यासाठी वन विभागाकडून आर्थिक मदत मिळून देण्यासाठी शेतकरी संघटना त्या ठिकाणी प्रयत्न करणार असल्याचे सचिन थोरवे यांनी सांगितले.