निपाणीत बांगलादेश विरुद्ध आंदोलन

Bharari News
0
भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावे आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करावी - प.पू. सच्चिदानंद बाबा 
निपाणी प्रतिनिधी सागर श्रीखंडे
                  निपाणी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात बंगलादेश विरोधात आंदोलन आणि निषेध करून बांगलादेश प्रतीमत्मक पुतळ्यास जोडे मारण्यात आले 

               यावेळी श्री दत्तपीठ तमणाकवाडा मठ येठील प.पू. सदगुरू सच्चिदानंद बाबा यांनी बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये, हिंदू साधुसंत हे नेहमी समाज हितासाठी आपल्या आयुष्य वाहिले आहेत आज त्यांच्यावरच बांगलादेशातील प्रशासन अन्याय अत्याचार करत असेल असेल तर फक्त निषेध करून चालणार नाही सर आपला भारत देश साधुसंत परंपरा यांच्या आदर्श वर चालणार आहे यासाठी यासाठी बांगलादेशातील हिंदू मठ मंदिरे साधुसंत हिंदू समाज आमचे रक्षण करण्यासाठी सैनिकी कारवाई करावी अशी मागणी यावेळी सद्गुरु सच्चिदानंद बाबा यांनी केली.

              यावेळी विश्व हिंदू परिषद चे जिल्हा अध्यक्ष प.पू.प्राणलिंग स्वामीजी यांनी चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी, तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी यावेळी प. पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी केली यावेळी बोलते वेळी प्राणलिंग स्वामीजी म्हणाले की बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार्‍या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय्य अटक करण्यात आली आहे. ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे. 

            स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांनी हिंदूंवर होणार्‍या अन्यायाला विरोध करत शांततापूर्ण मार्गाने आपले हक्क मागितले. त्यांच्या अटकेने बांगलादेशातील हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. हिंदूंवरील हे अत्याचार रोखले नाही, तर त्याचे लोण भारतात येण्यास वेळ लागणार नाही; म्हणून हिंदूंना भारत सरकारकडून कठोर भूमिका आणि निर्णायक पावले उचलण्याची मागणी यावेळी श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी केली,

           भारताने या वेळी इस्कॉनसह, सह विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज निपाणी सह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांने सहभाग घेतला होता यावेळी बांगलादेश विरोधात घोषणा देवून निषेध करण्यात आला. 

                 श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठाचे प. पू. प्राणलिंग स्वामीजी, सद्गुरु सच्चिदान बाबा दत्तपीठ तमांनाकवाडा,अनिल खांडके प्रभुजी, सुचित्रा ताई कुलकर्णी, पराग चुडेकर, प्रभुजी, अँड. सुषमा बेंद्रे,अमोल चेंडके यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी. प्रास्तविक दीपक भाडगावे व सूत्रसंचालन सागर श्रीखंडे यांनी केले यावेळी बबन निर्मले, चारुदत्त पावले, राजेश आवटे, अभिजीत सादळकर, आनंद पाटील, बालू हवालदार, ऋषिकेश माने,अमर देसाई, दीपक बुदिहाले,अजित परळे, अनिल बुडले या सह मोठ्या संख्येने हिंदुत्वावादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!