मकर संक्रांतीच्या अवचित्यांने सालाबाद प्रमाणे संतुलन महिला स्नेह मेळाव्यात महिला सदस्याना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी संतुलनने योजना लाभ मोहिमेला वाघेश्वर महिला बचतगट वाघोली (तालुका हवेली) येथे जे.जे. नगर मधून प्रारंभ केला आहे.
तिळगुळ घ्या गोड बोला मोठ्या उत्साहात साजरा करत महिलांसाठी विधायक कार्य, महिलांचे अधिकार, महिला सुरक्षा व शासकीय योजनांची अमलबजावणीचे आदी कार्य संतुलन पथकाने सुरु केले आहे.
वाघोली मधील जे जे नगर येथील वाघेश्वर महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंगल जगताप व प्रदिप जगताप यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाचे उदघाटन संतुलन संस्थेच्या संस्थापक संचालिका अँड पल्लवी रेगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या ओवी गीताने केले. संस्थेच्या अध्यक्षा वंदना भुजबळ यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तुचे वितरण करण्यात आले.
महिला आणि युवायुवतींसाठी कौशल्य आधारित प्रमाणित कोर्सेस सुरू केले असून त्याचा अधिकाधिकांनी लाभ घेण्याचे आवाहन अँड.पल्लवी रेगे यांनी केले. संतुलन अध्यक्ष वंदनाताई भुजबळ यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. बचत गटाचे सदस्य आशा कोतवाल आणि तांबेताई यांनी मान्यवरांचा यथोचित सन्मान केला.
संतुलन तर्फे प्रदीप जगताप, संतुलन पतसंस्था संचालिका मंगल ताई जगताप, मीराताई शितोळे, आकांक्षा शितोळे, योगिता शिळीमकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दिवसभर शेकडो कुटुंबाचे विविध योजनांचे ऑनलाइन व ऑफलाइन फॉर्म भरण्यात आले.
सर्व महिलांना मान्यवरांच्या शुभ हस्ते ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. पुढील काळात संतुलन स्नेह मेळाव्यातून हजारो महिलांपर्यत योजना लाभ देण्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचचे सुत्र संचालन अरिनाथ चांदणे व उपस्थितांचे आभार महिला पतसंस्थेच्या सिमा साळवे यांनी केले.