पुणे जिल्हा प्रतिनिधी
वढू बुद्रुक (ता शिरूर) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी ज्ञानेश्वर (माऊली आप्पा) हरिभाऊ भंडारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली,
तेरा सदस्य संख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली, मावळत्या सरपंच अंजली प्रफुल्ल शिवले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली, मोठा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या धर्मपीठ, शक्तिपीठ, स्वराज्याची दुसरी पंढरी असणाऱ्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक कायम आकर्षण ठरते, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोरेगाव भीमाचे मंडळ अधिकारी विकास फुके , तलाठी कैलास घोडे , ग्रामसेवक शंकर भाकरे यांनी कामकाज पाहिले,
या निवडी नंतर नवनिर्वाचित सरपंच माऊली (आप्पा) भंडारे यांनी सांगितले की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शंभूराजे समाधी स्थळ विकास कामांसाठी विशेष प्रयत्न करणार, गावातील अडी अडचणी शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या सहकार्यातून मार्गी लावणार असल्याचे सांगितले,