राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष दिपकभाऊ मानकर, कार्याध्यक्ष प्रदीपदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष जयदेव इसवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पुणे शहरातील समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, भरदिवसा होणारे खून, अपहरणाची घडलेली प्रकरण, वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यात गुंडांचा वाढलेला हस्तक्षेप, अवैध धंदे, त्याच प्रमाणे शाळे सारख्या ज्ञान दानाच्या पवित्र मंदिरात संस्थाचालक कर्मचारी शिक्षक यांच्या कडून लहान मुले मुली यांवर होणारे अनैसर्गिक अत्याचार, छळ, असुरक्षित महिला व सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास हा या वर्षात खूपच वाढला अनेक गुन्ह्यांची नोंद झाली, उकलही झाली एकंदरीत या वर्षी गुन्हेगारी मध्ये वाढ झालेली दिसली यावर येणाऱ्या नवीन वर्षात आळा घालण्यासाठी, गुन्हेगारी ला चाप बसावा म्हणून योग्य ती कडक, धडक कारवाई करण्याची गरज आहे
त्यासाठी २०२५ हे वर्ष नागरिकांना गुन्हेगारी मुक्त वर्ष आनंदाचे निर्भीड वातावरणात जावे म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशा आशयाचे पत्र निवेदन सामाजिक न्याय विभागाचे माध्यमातून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना देण्यात आले
या प्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष जयदेव आहिलू इसवे, उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर, कसबा विधानसभा अध्यक्ष शुभम शिंदे आणि पदाधिकारी उपस्थित होते,