६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू करून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला.
या दिनाचे स्मरण म्हणून महाराष्ट्रात ६ जानेवारी हा दिवस दर्पण दिन किंवा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो..
बाळशास्त्रीं जांभेकर यांचा जन्म २० फेब्रुवारी १८१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे झाला; तर १७ मे १८४६ रोजी तापाचे निमीत्त होऊन त्यात त्यांचे निधन झाले. तीन वर्षांपुर्वी महाराष्ट्र सरकारने बाळशास्त्री जांभेकर यांचा राज्यातील महनिय व्यक्तींच्या यादीत समावेश केला आहे. प्रकांड पंडित, भाषा प्रभू असलेल्या बाळशास्त्रींचे कार्य आमच्यासाठी आदर्शवत व मार्गदर्शक असेच आहे.
----------------------------------------------
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन.. पत्रकार दिनानिमीत्त शुभेच्छा.. 🙏