खळबळजणक...! दफनभूमीच्या जागी बेकायदेशीर मज्जिद केसनंद मधील प्रकार

Bharari News
0
दफनभूमीच्या जागी बेकायदेशीर मज्जिद...
पुणे जिल्ह्याच्या केसनंद येथील प्रकार 
ग्रामस्थांनी केली तक्रार
सुनील भंडारे पाटील
             पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील केसनंद ग्रामपंचायत येथील गट नंबर २६१/३ मधील ५ गुंठे जागा काही वर्षांपूर्वी बाबू रामोशी यांनी बक्षीस पत्र करून मुस्लीम समाजाच्या दफनभूमी (कब्रस्तान) साठी दिली होती. ती जागा फक्त दफन भूमी साठी दिली असता त्या ठिकाणी आता अनधिकृतपणे बेकायदेशीर रित्या मस्जिद उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

      या मज्जिदीच्या बांधकामासाठी कुठल्याही प्रकारची पीएमआरए किंवा बांधकाम विभागाची परवानगी घेतली नाही. या बेकायदेशीर बांधकामाबद्दल केसनंद ग्रामपंचायत मध्ये कुठल्याही प्रकारची नोंद नाही. किंवा ग्रामपंचायतीने यांना न हरकत प्रमाणपत्र हे दिले नाही.

याबाबत केसनंद येथील स्थानिक नागरिक कुशल सातव यांनी आवाज उठवला आहे . याप्रकरणी बोलताना सातव यांनी सांगितलं की ही जागा काही वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी कब्रस्तानासाठी दिलेली होती. परंतु काही वर्षानंतर या जागेवरती बेकायदेशीर रित्या मज्जित बांधण्यात आलेली आहे. हे बेकायदेशीर बांधकाम त्वरित काढण्यात यावी अशी संबंधित विभागाकडे केलेली आहे. या मज्जीद मुळे भविष्यात दफनभूमी ला जागा अपुरी पडणार आहे. 

            तर येथे आता नमाज पठण करण्यास देखील सुरुवात झाली आहे. याबाबत केसनंद ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पी व्ही ढवळे यांनी सांगितले की या ठिकाणी मज्जित सदृश बांधकाम झालेले आहे ,या बांधण्यासाठी कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायत कडून परवानगी देण्यात आली नाही, याबाबत तक्रारी आल्या असून लवकरच ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगमध्ये यावरती चर्चा होणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!