पेरणे फाटा (तालुका हवेली) येथील झोपडपट्टी परिसरातील कचरा नित्य रोजपणे जाळण्यात येत असल्याने यातून निघणारा धूर कोरेगाव भिमा व भिमा नदीच्या पुलावर येत असल्याने या कोरेगाव भिमातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला असून कोरेगाव भीमाचे कारभारी यावर आवाज उठविणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पेरणे ग्रामपंचायतच्या वतीने गावठाण तसेच वाड्या वस्तीवरील कचरा घंटागाडीच्या माध्यमातून एकत्र करून पेरणी फाटा भीमा नदीच्या तीरावर हा कचरा संकलित केला जात आहे, परंतु या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता तसेच कचरा व्यवस्थापन न करता पर्यावरणाचे मोठे नुकसान करून 24 तास हा कचरा जाळला जात असल्याने त्यापासून तयार होणारा धूर पूर्व बाजूच्या मोठ्या लोकवस्तीत तसेच कोरेगाव भीमा गावामध्ये धुपसरला जात आहे, त्यामुळे नागरिकांचा आरोग्य धोक्यात आले आहे,
मागील काही वर्षांपासून पेरणे फाटा येथील भिमा नदीला लागून असलेल्या भागात कचरा टाकण्यात येतो. या भागात कोरेगाव भिमा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या देखील आहेत. या कचऱ्याचे कोणत्याही प्रकारे विभाजन न करता तो थेट जाळण्याचा प्रकार राजरोज पणे सायंकाळच्या सुमारास घडत असतो. यामुळे कोरेगाव भिमा येथील नागरिकांना खोकला, श्वसनाचे आजार मागे लागले आहेत.
या कचऱ्याचा सर्वात जास्त त्रास नदी लगतच्या भागातील नागरिकांना होत आहे. त्यामुळे गावचे कारभारी किमान या गंभीर प्रश्नाकडे पाहतील असा आशावाद ग्रामस्थ व्यक्त करत आहे.