पुणे प्रशासनात प्रथमच एकाच कुटुंबातील तिघे IAS, IPS

Bharari News
0
प्रतिनिधी वैभव पवार
                पुणे प्रशासनात प्रथमच एकाच कुटुंबातील तिघे IAS, IPS, कुटुंबातील तीन व्यक्तींकडे वेगवेगळा कार्यभार,
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा विवाह आयपीएस आंचल दलाल यांच्याशी झाल्या. आंचल या उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील आहेत. आंचल यांचा परिवार गाझियाबादमध्ये राहतो. त्यांचे वडील दूरसंचार विभागात जीएम होते. 2018 मध्ये त्या आयपीएस झाल्या. आंचल यांचा मोठे भाऊ शेखर दलाल 2012 मध्ये आयएएस झाले होते.
पुणे प्रशासनात प्रथमच एकाच कुटुंबातील तिघे IAS, IPS, कुटुंबातील तीन व्यक्तींकडे वेगवेगळा कार्यभार
एकाच कुटुंबातील तिघे आयएएस अन् आयपीएस.
 आयएएस आणि आयपीएस होण्याचे स्वप्न अनेक तरुण-तरुणी पाहत असतात.

 परंतु त्यामधून काही जणांना यश मिळते. परंतु एकाच कुटुंबातून तीन जण आयएएस आणि आयपीएस होण्याचा प्रकार विरळच आहे. त्यानंतर ते तिघे एकाच जिल्ह्यात येणे दुर्मिळ प्रकार आहे. परंतु आता पुण्यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पुण्याचा वेगवेगळा कार्यभार सांभाळणार आहे. राज्यातील प्रशासनात झालेल्या बदलानंतर हा प्रकार झाला आहे. पुण्याच्या जिल्ह्याधिकारीपदी जितेंद्र डुडी आले आहेत. त्यांच्या पत्नी आंचल दलाल आयपीएस असून त्या पुण्यात आहे. तसेच त्यांचे मेहुणे शेखर सिंह पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त आहेत.

राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुणे जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी दिली आहे. यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी असलेले डॉ. सुहास दिवसे यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील सचिवपदी पदोन्नती मिळाली आहे. पुण्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या पत्नी यापूर्वीच आयपीएस आहे. त्यांच्या पत्नी आंचल दलाल हाय राज्य राखीव दलात (एसआरपीएफ) आहेत. तसेच जितेंद्र डुडी यांचे मेहुणे शेखर सिंह हे यापूर्वीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबातील तीन जण पुण्यात आहेत.
कोण आहेत जितेंद्र डुडी
जितेंद्र डुडी हे २०१६ च्या बॅचचे आयपीएस आहेत. ते मूळचे राजस्थानमधील जयपूरचे आहेत. झारखंडमधून त्यांनी प्रशासकीय सेवा सुरु केली. ते केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिव होते. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांना महाराष्ट्रात पदस्थापना दिली गेली. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हाधिकारी त्यानंतर आता पुण्याचे जिल्हाधिकारी ते झाले आहेत.

भाऊ आयएएस तर बहीण आयपीएस
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा विवाह आयपीएस आंचल दलाल यांच्याशी झाल्या. आंचल या उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील आहेत. आंचल यांचा परिवार गाझियाबादमध्ये राहतो. त्यांचे वडील दूरसंचार विभागात जीएम होते. 2018 मध्ये त्या आयपीएस झाल्या. आंचल यांचा मोठे भाऊ शेखर दलाल 2012 मध्ये आयएएस झाले होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!