ओव्हर ब्रिज प्रकल्पाच्या कामाची मार्च 2025 शुभारंभ शक्यता-आमदार कटके यांचा पाठपुरावा

Bharari News
0
एलिव्हेटेड फ्लायओव्हर प्रकल्पाच्या कामाची तातडीने सुरवात करणे कामी आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा पाठपुरावा : मार्च २०२५ पासून काम सुरू होण्याचे संकेत 
 
सुनील भंडारे पाटील
                शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी गेल्या काही दिवसातच नगर रोड वाहतूक कोंडी या समस्येवरती उपाययोजना म्हणून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवले आहे. त्यामुळे नगर रोड वाहतूक कोंडीतून थोडासा मोकळा श्वास वाहनचालकांना घ्यायला मिळाला.
  
आता त्याच पाठोपाठ कटके यांनी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतील एलिव्हेटेड खराडी बायपास ते शिरूर या अत्याधुनिक एलिव्हेटेड फ्लायओव्हर च्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होण्यासाठी पाठवपुराव्यास सुरवात केली राज्यातील पहिला अत्याधुनिक एलिव्हेटेड फ्लायओव्हर प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा तर्फे खराडीपासून ते शिरूरपर्यंत तयार केला जाणार आहे. 

तसेच भूसंपादनापूर्वी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला ठरवून देणे आदी कामांकरिताचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आले असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मार्च २०२५ मध्ये सुरू करण्याबाबत शासनाने सकारात्मकता दर्शविली आहे, असे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.  

मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ विभागाचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांच्याशी झालेल्या विशेष बैठकीत सदर प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिरूर-हवेली मतदार संघासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या या ६० कि.मी. लांबीच्या प्रकल्पाची तातडीने सुरुवात करण्याबाबत संबंधीत विभागांनेही सकारात्मकता दर्शविली आहे. 

या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ज्यावरून महामेट्रो त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून चारचाकी वाहने आणि तळातील रस्त्यावरून अवजड वाहतूक व्यवस्था असणार आहे. हा अत्याधुनिक उड्डाणपूल खराडीपासून ते शिरूर बायपासपर्यंत होणार आहे. खराडी, लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरूर या पाच ठिकाणी उड्डापुलाला एक्झीट असणार आहे. 

या तीन मजली उड्डाणपुलामुळे पुणे-नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या कायमची मार्गी लागणार असल्याचे आमदार कटके यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पांकरिता भूसंपादनापूर्वी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. राज्यशासन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देणार असून या कामाला प्रत्यक्षात मार्च २०२५ च्या महिन्याच्या अखेरीस सुरूवात होणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर पुणे शहरातील वाहतुकीवरील ताणही कमी होणार आहे. याबाबत राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत असून शिरूर-हवेली मतदारसंघातील सर्वात मोठा प्रकल्प मंजूर झाला असल्याचे समाधान आहे, असे आमदार कटके यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!