आळंदीत शिवजयंती विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरी

Bharari News
0
आळंदीत शिवजयंती विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरी  
आळंदीत रक्तदान शिबिरास उत्साही प्रतिसाद
आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर 
               तीर्थक्षेत्र आळंदीत रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, सर्व सामान्य जनते सह सर्व जाती धर्माला बरोबर घेत स्वराज्याची स्थापना करणारे महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आळंदी पंचक्रोशीत मोठ्या आनंदी उत्साही शिवभक्तीमय जल्लोषमय वातावरणात, सवाद्यांच्या गजरात, मराठ मोळ्या वेशभूषा पेहराव, टाळ मृदुंगासह हरिनामाचे आणि शिव जय घोष करणाऱ्या घोषणांचे जयघोषात, सवाद्यात शिवजयंती साजरी करण्यात आली.

  येथील आळंदी नगरपरिषद, ग्रामस्थ व विविध सेवाभावी संस्था, मंडळे यांचे वतीने शिवजयंती ( दि.१९ ) विविध उपक्रमांनी जल्लोषी उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस भीमा नरके, दिघी आळंदी वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले.

   या वर्षीचे शिवजयंतीचे जल्लोष खास आकर्षण ठरले. उत्साही शांततेत, जल्लोषात विविध ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली. गेल्या काही वर्षापासून आळंदी आणि पंचक्रोशीत दिघी आणि आळंदी पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली शांततेत शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला. त्याच प्रमाणे यावर्षी देखील आळंदीत तसेच पंचक्रोशीत शिवजयंती उत्सवाचे आयोजन उत्साही जल्लोषात करण्यात आले. 

 आळंदी ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आळंदी नगरपरिषद चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्यास अभिषेक आणि पुष्पांजली पुष्पहार अर्पण करण्यात आली. शिवजयंती निमित्त श्री क्षेत्र तुळापूर ते आळंदी अशी शिवज्योत शिवभक्त युवक, तरुणांनी उत्साहात आणली. आळंदी नगरपरिषद चौकात श्रींचे स्मारका शेजारील प्रशस्त जागेत सालाबाद प्रमाणे यावर्षी ही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यास आळंदीत रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला. 

शिवस्वराज्य प्रतिष्ठान आळंदी आणि रौद्र शंभो फाउंडेशन वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन उत्साहात करण्यात आले. यास आळंदी नगरपरिषदेने विशेष सहकार्य केले. यावेळी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, उदय काळे, मनोहर दिवाणे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, ज्ञानेश्वर रायकर, अर्जुन मेदनकर, शिवसेना उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, मंडूबाबा पालवे, संचालक कृष्णा खोरे महामंडळ, राम गावडे, आदींनी श्रींचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शालेय मुलांनी परिसरात शिवजयघोष करीत परिसारत शिवजयंतीचा जोष भरला.  

 आळंदीतील विविध मंडळे, शाळा, ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी शिवजयंती उत्सवा निमित्त भव्य शोभायात्रा श्रींची मिरवणूक पद यात्रा फेरी काढली. या मिरवणुकीत ढोल, ताशा पथक, बँड पथक, वारकरी दिंडी, लक्षवेधी रांगोळीच्या पायघड्या, प्रात्यक्षिके, सवाध्ये, मावळे, फटाक्यांचे आतिश बाजी मिरवणुकीचे मार्गावर करण्यात आली. चाकण चौक, भैरवनाथ चौक, नगरपालिका चौक मार्गे विविध शाळांनी शालेय मुलांची फेरी मिरवणूक शिवाजी महाराज स्मारक येथे जल्लोषात आली.  

  या मिरवणुकीसह शिवजयंतीसाठी आळंदी ग्रामस्थ आणि आळंदी पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, दिघी आळंदी वाहतूक शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्रभावी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, अभियंता सचिन गायकवाड यांनी शिवजयंती उत्सवास नगरपरिषदेच्या माध्यमातून विशेष सहकार्य केले. आळंदी ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक नगरपरिषदेचे माजी पदाधिकारी, युवक तरुण उपस्थित होते. आळंदी ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.  

 गावा गावातील घराघरांतून शिवजयंतीचा उपक्रम अतिशय उत्साहात राबविण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्मारक परिसरात फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवज्योतीचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. विविध उपक्रमात महाअभिषेक करून पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले. यानंतर महाराजांची आरती करण्यात आली. गावातील राजकारण कमी होऊन एकोपा वाढीस गाव एकसंध राहण्यास शिवजयंती उपक्रम मार्गदर्शक ठरेल अशा भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!