सुनील भंडारे पाटील
संतुलन संस्थेच्या वतीने प्रगती महिला बचत गट, जोगेश्वरी महिला बचत गट व सखी संतुलन महिला बचत गट केसनंद यांया अनोख्या पद्धतीने ग्रामपंचायत केसनंद (ता हवेली) सभागृहामध्ये तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
समाजात विधवा महिलांचा यथोचित सन्मान व्हावा त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी विधवा महिला बरोबरच सौभाग्यवतींचा एकत्रित वाण देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शोभा हरगुडे यांनी संतुलन संस्था कायम महिलांचा सन्मान करत असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम अनेक वर्षे सातत्याने करत असल्याचे मत मांडले.
संतुलन संस्थेच्या संस्थापक संचालिका अँड पल्लवी रेगे यांनी महिलांच्या सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकून खऱ्या आर्थिक व सामाजिक स्वातंत महत्वाचे असल्याचे मत मांडले, त्यांनी शिक्षण, बचत गट, कौशल्य शिक्षण यामुळे सामाजिक दर्जा उंचावत असल्याचे मत मांडले.
विद्यमान सरपंच सुनीता बाळासाहेब हरगुडे यांनी संतुलनाचे कार्य गौरवास्पद असल्याचे मत मांडले.संतुलन संस्थेचे अध्यक्ष वंदनाताई भुजबळ यांनी उपस्थित त्यांना शुभेच्छा देऊन बचत गट खऱ्या अर्थाने सक्षमीकरणाचे साधन असल्याचे मत मांडले. यावेळी संतुलन महिला पतसंस्थेच्या संचालिका मंगल ताई जगताप, कांचन ओव्हाळ, जोगेश्वरी महिला भजनी मंडळ अध्यक्ष लिलाबाई हरगुडे उपस्थित होत्या.
प्रगती महिला बचत गटाचे खजिनदार ज्ञानेश्वर पाटेकर, जोगेश्वरी महिला बचत गटाच्या संगीता परिहार, सखी संतुलन महिला बचत गटाच्या पूजा गजभिये यांनी बचत गटाची माहिती दिली.
संतुलन बचत गटांच्या महिलांनी आपला परिचय देण्याबरोबरच उखाणे घेतली. विशेष सन्मान मंजुळा पवार, अनिता पवार, चारुशीला बागुल, विजया कोल्हे, हेमा अग्रवाल, सरिता गायकवाड, मीना तारू, ज्योती दिवसे यांचा करण्यात आला. कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन संतुलन संस्था व संतुलन महिला पतसंस्था यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा हरगुडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संतुलन कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना वानव अल्पोपहार देण्यात आला.