श्री रामचंद्र इंजिनिअरिंग कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Bharari News
0
श्री रामचंद्र अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालयचे लोणीकंद पुणे येथे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा क्षितीज मोठया उत्साहात साजरा
सुनील भंडारे पाटील
           श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे श्री रामचंद्र अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालय लोणीकंद (तालुका हवेली) येथे दर वर्षाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. या मध्ये मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यावर भर देण्यात येतो. या कार्यक्रम प्रसंगी रुपालीताई निलेश चाकणकर महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष प्रमुख पाहुणे मनून उपस्थित होत्या. 

                  या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपला मुलगा इंजिनीयर डॉक्टर वकील झाला पाहिजे ते पूर्ण करण्यासाठी ते अपार कष्ट घेत असतात. आपले स्वप्न पूर्ण झाले नसतील तरी आपल्या मुलाने हे स्वप्न पूर्ण करावी अशी त्यांची इच्छा असते,

 आणि हे ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण या महाविद्यालयात घेत आहे यामध्ये या महाविद्यालयाचे खरे यश आहे. या महाविद्यालयाचे हे विद्यार्थी गरुड झेप घेवून महाविद्यालयाचे नाव मोठे करतील अशी भावना या प्रसंगी व्यक्त केली.विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर मैदानी खेळ स्पर्धेत भाग घेणे व व्यवहारी ज्ञान घेतलेच पाहिजे त्याचबरोबर त्यांनी भूमकर परिवाराचे ही कौतुक केले की ग्रामीण भागात असे सुसज्ज महाविद्यालय उभे केले व त्याचा ग्रामीण भागातील मुलांना उपयोग होत आहे. 

या कार्यक्रम प्रसंगी रुपालीताई निलेश चाकणकर महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष यांच्या हस्ते सुभाष इंद्रभान लोणकर (आदर्श सरपंच ) यांचा ग्रामीण भागातील कार्यबदल सत्कार करण्यात आला तसेच अशोक रामचंद्र बारवकर यांचा उदयोग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्राची रुपेश जाधव (नगरविकास सहाय्यक आयुक्त) यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला,

 विजय राजाभाऊ भुजबळ यांचा उदयोग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थीचा राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर , व विधापीठ स्तरावर उल्लेखनीय कामगीरी केलेल्या विद्यार्थीचा सत्कार ताई च्या हस्ते पारीतोषिक देवून गुणगौरव करण्यात आला.

तसेच श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव शंकर रामचंद्र भूमकर यांनी विद्यार्थयांना, पालकांना व शिक्षकांना मार्गदर्शन करताना मुलांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून महाविदयालयाचे नाव मोठे केले पाहिजे . शिक्षकांनी ग्रामीण भागातील मुलांना प्रोसाहित करून यशस्वी कसे होतील या कडे लक्ष्य दिले पाहिजे . 

ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक अडचणी येऊ नये मनून त्यांनी श्री रामचंद्र अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालयची स्थापना केली. या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा प्रसंगी उपस्थित श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार उद्धव रामचंद्र भूमकर , रुपाली शंकर भूमकर, लक्ष्मी उद्धव भूमकर , . स्वप्नाली संजय भुजबळ, वासुदेव नामदेव कचरे,  अशोक रामचंद्र बारवकर (उद्दोजक ), सुभाष इंद्रभान लोणकर (आदर्श सरपंच ), प्राची रुपेश जाधव (नगरविकास सहाय्यक आयुक्त), विजय राजाभाऊ भुजबळ(उद्दोजक ), संजय राजाभाऊ भुजबळ(उद्दोजक ),  इंद्रजीत सतीश बारवकर (उद्दोजक ), संदेश रवींद्र लोणकर (उद्दोजक ),  संकेत विजय सायकर (उद्दोजक ) व  रामचंद्र अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालयचे टेक्निकल डायरेक्टर सिद्धांत शंकर भूमकर तसेच ईतर मान्यवर उपस्थित होते.    

श्री रामचंद्र अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालयचे प्राचार्य डॉ अविनाश देसाई यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ सुषमा तायडे , प्रा डॉ सागर शिंदे, प्रा विकास गायकवाड, प्रा भीमराव बोरुडे , प्रा डॉ नीलम कुमार , प्रा डॉ वैशाली तुराई, प्रा दीपाली होडाडे,प्रा आकाश चौरे, प्रा बोलाडे , प्रा गुणावरे, प्रा पटेल मॅडम व अनिल जमदाडे तसेच , शिक्षकांनी व विध्यार्थ्यांनी यशस्वीपणे केले. त्यामधून विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!