लोणी काळभोर येथे आरोग्य तपासणी शिबिर

Bharari News
0
शिवम हॉस्पिटल ( लोणी काळभोर ) तर्फे गोल्ड सिटी सोसायटी ( लोणी काळभोर ) मध्ये घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांनचा उत्स्फूर्त प्रतिसाद ........

यवत प्रतिनिधी
         उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करण्याचे काम लोणी काळभोर मधील शिवम हॉस्पिटल हे अनेक वर्षानुवर्ष करत आहे, शिवम हॉस्पिटल चे व्यवस्थापक डॉक्टर राहुल काळभोर सर यांनी आरोग्य सेवा घरोघरी या उपक्रमांतर्गत सर्व ग्रामीण भागात,नागरी वसाहती मध्ये तसेच अनेक मोठमोठ्या सोसायटी मध्ये नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळाव्यात या हेतूने आरोग्य शिबिरे अनेक वर्षा पासून चालू केलेली आहेत.
       अनेक भागांमध्ये आरोग्यसेवा पोहोचत नाहीत त्या त्या ठिकाणी जाऊन जीवन सुरक्षा अभियाना द्वारे बेसिक लाईफ सपोर्ट ट्रेनिंग यामध्ये सीपीआर ट्रेनिंग तसेच हेल्थ टॉक अशा विविध माध्यमातून आरोग्य विषयक जनजागृती करण्याचे काम डॉक्टर राहुल काळभोर सर करत आहेत , ग्रामीण भागात, अल्प लोकवस्ती वरती, मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेऊन तेथील नागरिकांना सवलतीच्या दारांमध्ये उपचार शिवम् हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे,तसेच अनेक शासकिय योजना नागरिकांन पर्यंत पोहचून अनेक मोफत शस्त्रक्रिया शासकीय योजने मार्फत करून दिल्या जात आहेत.
       शिवम् हॉस्पिटल मध्ये अनेक शासकीय योजना राबवल्या जात असल्यामुळे रुग्णांना याचा फायदा होत आहे, शिवम् हॉस्पिटलमध्ये फ्री डायलिसिस , तसेच पुणे महानगरपालिकेची शहरी गरीब योजना, केंद्र सरकारची सीजीएचएस योजना, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी, तसेच पीएमसी ची अंशदायी योजना, अशा विविध योजनांचा समावेश शिवम हॉस्पिटलमध्ये आहे , त्यामुळे लोणी काळभोर तसेच आजूबाजूच्या आणि पुणे परिसरातील नागरिकांना याचा फायदा मोठ्या प्रमाणात होत असलेला दिसून येत आहे.
      आज गोल्ड सिटी सोसायटीमध्ये अनेक नागरिकांन ची मोफत आरोग्य तपासणी शिवम हॉस्पिटल तर्फे केली गेली यामध्ये प्रामुख्याने वजन,उंची,बीपी,शुगर, बी एम आय तसेच अनुभवी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मोफत गोळ्या-औषधांची वाटप केली गेली.
       सवलतीच्यादरा मध्ये वार्षिक आरोग्य तपासणी ,अल्प दरामध्ये सिटीस्कॅन ,एक्स-रे , रक्त लघवी चाचण्या अशा अनेक सेवांचा समावेश सवलतीच्या दरात करून देण्याचे या शिबिरा दरम्यान डॉक्टर राहुल काळभोर सरांनी यावेळी सांगितले आहे. तसेच कोणाला आरोग्य विषयक कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी असल्यास शिवम हॉस्पिटल मधील ॲम्बुलन्स सेवा मोफत दिली जाईल असे त्यांनी यावेळेस सांगितले.
       यावेळेस शिबिर आयोजक देवेंद्र रासकर साहेब तसेच गोल्ड सिटी सोसायटी मधील पदाधिकारी या शिबिराला उपस्थित होते.या शिबिरा मुळे वयस्कर तसेच नविन तरुण-तरुणींना देखील चांगल्या प्रकाराची आरोग्य सेवा मिळाली असल्याचे या वेळेस शिबिरातील नागरिकांनी सांगितले.
     यावेळी बोलताना डॉक्टर राहुल काळभोर सरांनी सर्वांना निरोगी जीवन जगण्याचा कानमंत्र सांगितला आहे, दररोज सकाळी लवकर उठून व्यायाम करणे , योगासन करणे , प्राणायाम करणे , तसेच वेळोवेळी आपल्या आरोग्याची वार्षिक आरोग्य तपासणी करून घेणे , तसेच पौष्टिक आहार घेणे , मोड आलेले कडधान्यांचा आहारात समावेश करणे , दिवसभरात शरीरासाठी लागणारे पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे , तसेच वजन नियंत्रित ठेवणे , जेवण करण्याच्या योग्य पद्धतीचा अवलंब करणे अशा विविध प्रकारचे सल्ले यावेळी डॉक्टर राहुल काळभोर सरांनी दिले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!