वाघोली (तालुका हवेली) सोसायटी प्रिमियर लीग (पर्व ३) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ लक्ष्मण (नाना) कटके, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा वाघोलीचे माजी उपसरपंच संजय सातव पाटील, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा वाघोलीचे माजी सरपंच रामभाऊ दाभाडे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश बापू कुटे, वाघोलीचे माजी उपसरपंच तथा मनपा स्वीकृत नगरसेवक शांताराम बापू कटके, आव्हाळवाडीचे माजी उपसरपंच संदेश आव्हाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या हस्ते पार पडला.
युवराज कटके सोशल फाउंडेशन व वाघोली सोसायटी क्रिकेट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुख्य आयोजक सोमनाथ (बापू) कटके व युवराज(भैया) कटके यांच्या नेतृत्वाखाली वाघोली सोसायटी प्रिमियर लीग (WSPL) क्रिकेट महासंग्राम (पर्व ३) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला शनिवारी ८ फेब्रुवारी पासून,वाघोली,आव्हाळवाडी येथील राजगड स्पोर्ट अॅकॅडमीच्या ग्रीन ग्रास क्रिकेट ग्राउंडवर दिमाखात सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा ८ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते लक्ष्मण (नाना) कटके, वाघोलीचे माजी उपसरपंच संजय सातव पाटील, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा वाघोलीचे माजी सरपंच रामभाऊ दाभाडे, वाघोलीचे माजी उपसरपंच तथा पुणे मनपा शासन नियुक्त नगरसेवक शांताराम बापू कटके, दाभाडे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश बापू कुटे, आव्हाळवाडीचे माजी उपसरपंच संदेश आव्हाळे, स्पर्धेचे मुख्य आयोजक सोमनाथ कटके, युवराज कटके, चेअरमन सोमनाथ आव्हाळे, भाजप युवा मोर्चा माजी हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदिप सातव, माजी उपसरपंच समीर आबा भाडळे, सुनील (चाचा) जाधवराव, वाघोलीचे माजी उपसरपंच मारुती (अण्णा) गाडे, वाघोली तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रमोद भाडळे, रविंद्र वाळके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (एसपी) हवेली तालुका उपाध्यक्ष प्रकाश जमधडे, समालोचक प्रवीण कामटकर, समाधान अवचट, पंच तुषार मेटे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम वाघमारे, अखिल भारतीय सेनेचे जिल्हाध्यक्ष शनी शिंनगारे, योगेश (नाना) सातव, अशोक खांडेकर, नियोजक प्रकाश लोले आदी मान्यवर मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी संघ :
१) पुरंदर पेशवाज २) देवगीरी ड्रॅगन्स ३) पन्हाळा पँथर्स ४) लोहगड लायन्स ५) सिंहगड स्पार्टन्स ६) प्रतापगड पॉवर्स ७) शिवनेरी स्ट्राईकर्स ८) राजगड रायडर्स ९) देवगड डायमंडस १०) रायगड रॉयल्स ११) तोरणा टायटन्स १२) अजिंक्यतारा अव्हेंजर्स १३) जंजिरा जॅगवॉर्स १४) तिकोना टायगर्स