पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला पकडण्यासाठी मोठी पोलीस फोर्स तैनात करण्यात आली होती, पोलिसांच्या अथक प्रयत्न नंतर अखेर त्याला आज मध्य रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गुणाट येथील उसाच्या शेतामधून पकडण्यात आले,
दत्ता गाडे हा राजकीय नेत्याचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही तो प्रचारात सहभागी झाल्याचे काही छायाचित्रांमधून जनतेच्या समोर आले आहे,
आरोपी दत्ता गाडे याच्या व्हॉट्सअप डीपीवर आमदाराचा फोटो आहे. शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो असल्याचे समोर आले आहे. आरोपी दत्ता गाडे हा गावातील लोकांना उज्जैन येथे महाकाल येथे दर्शनाला घेऊन जायचा. आमदाराचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा अशी माहिती समोर आली आहे. दत्ता गाडे याच्या या घाणेरडे कृतीमुळे समाजा तुन तीव्र संतापाची लाट उसळली असून त्याला मोठे राजकीय पाठबळ असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे,