मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्म दिवशी साजरा करण्यात येतो.कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत.
मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी, २०१३ रोजी घेण्यात आला.कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे.मराठीचा सन्मान वाढविण्यात ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले,
ज्यात 'विवेकसिंधू' (शा.श.१११०) हे मराठी भाषेतील पहिले ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज यांचे आणि मराठी भाषेला सर्वप्रथम सन १९६५ मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण केले जाते.
आज अनेक ठिकाणी शासकीय, खाजगी तसेच शाळा, कॉलेजेस मध्ये मराठी भाषा दीन साजरी केला जातो, कासुर्डी (तालुका दौंड) मधिल जयहिंद विद्यालयात देखील मराठी राजभाषा दिन साजरा केला गेला यावेळी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.जे के थोरात सर आणि ज्येष्ठ शिक्षक श्री.बी एन नाळे सर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यावेळेस विद्यालयातील सर्व शिक्षक स्टाफ कर्मचारी उपस्थित होते,मराठी राजभाषा दिनानिमित्त जयहिंद विद्यालय कासुर्डी येथील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर टाळा हा संदेश नागरिकांना दिला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने कागदी पिशव्या बनवल्या आणि त्याचे किराणा दुकान तसेच मेडिकल स्टोअर मध्ये वाटप केले आणि प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम आणि मानवी आरोग्या वरती प्लास्टिक मुळे होणारा परिणाम याविषयी माहिती दिली, यावेळी जयहिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.जे के थोरात सर यांनी देखील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनाचे महत्व पटवून सांगितले तसेच मराठी भाषेचे राजकीय,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनन्य साधारण महत्व असलेले पटून दिले यावेळी जयहिंद विद्यालय कासुर्डी येथील सर्व शिक्षक स्टाफने देखील विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व समजावून सांगितले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच जयहिंद विद्यालयामध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त सामूहिक वाचनाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांनी कवितांचे सुंदर चाली मध्ये गायन केले तसेच अनेक विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा दिना विषयी माहिती दिली, या सर्व उपक्रमामुळे विद्यालयाचे वातावरण मराठीमय झाले त्यासाठी विद्यालयातील मुख्याध्यापक श्री.जे के थोरात सर , आखाडे मॅडम , जगताप मॅडम तसेच सर्व शिक्षक स्टाफ , कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी खूप परिश्रम घेतले आणि मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व पटवून दिले.