सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील फ्रेड्स एज्युकेशन इनिटिट्यूट च्या फ्रेड्स नर्सरी प्रायमरी सेकंडरी स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अकॅडमीक कार्निवल आणि आठबडे बाजारचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्धाटन संस्थेचे सचिव दिलीप भोसले यांच्या हस्ते करण्यात आले,
याप्रसंगी शाळेतील सर्व महिला शिक्षकांना, उपस्थित महिला पालकांना गुलाब पुष देउन आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या रुभेच्छा देण्यात आल्या, अकॅडमी कार्निव्हल मध्ये विज्ञान, गणित, मराठी, इंग्रजी, हिंदी, सामाजिक रास्र, संगणक आणि कला या सर्व विषयावरती मुलांनी आकर्षक असे प्रोजेक्ट तयार केले होते. या उपक्रमाला पालकांचा उत्फूर्त असा प्रतिसाद मिळाला
ते नववीच्या मुलांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. त्यामध्ये दैनंदिन वस्तू, भाजीपाला, फळे , स्टेशनरी वस्तू, किराणामाल यांचा समावेरा होता. सर्वच पालक विद्यार्थयाकडून लागणाऱ्या वस्तू खरेदी करताना दिसत होते. शिक्षकांनी व विद्यार्थयांनी बनवलेल्या सेल्फी स्टॅन्ड पालकांना विरोष आकर्षित करत होते.
विद्या अभ्यासाबरोबरच आर्थिक व्यबहाराचे ज्ञान होण्यासाठी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सैंदाणे यांनी सांगितले. तसेच संस्थेचे अध्यक्ष, अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे यांनी सर्व विषयांच्या प्रोजेक्टला आणि आनंदी बाजारला भेट देऊन काही जीवनावड्यक वस्तू खरेदीही केल्या सदर उपक्रम यशस्वी केल्याबद्दल मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांचे विशोष कौतुक करण्यात आले. संस्थेच्या सर्व संचालकांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या व सदर उपक्रमाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्य्रमाचे सत्रसंचालन मारुती दरेकर यांनी केले तर आभार श्रीमंत प्रताले यांनी मानले,