दि. 14/03/2025 रोजी 13/30 वा. चे सुमारास जखमी इसम नामे रितेश अमृत कटके वय २८ रा विठ्ठलवाडी, वाघोली, पुणे हा डी मार्ट चे समोर बकोरी फाटा वाघोली पुणे येथे मॅकडोनल्स चे पाठीमागे लघूशंकेसाठी जात असताना आरोपी नामे सूरज जाधव व त्याचे इतर तीन साथीदार यांनी “तू आम्हाला उग्रट का बोलला, तुला आता जिवंत सोडणार नाही” असे म्हणून संगमत करून दगड व हातातील कड्याने गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले
प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद आहे . सदर गुन्ह्याचे अनुषंगाने दिनांक 14/03/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत सदर आरोपींचा शोध घेत असताना *ऋषीकेश ताकवणे* यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमूद गुन्ह्यातील *पाहिजे आरोपी सुरज राजु जाधव वय २१ वर्षे धंदा - मजुरी रा.चौधरी बिल्डींग फ्लॅट नं २०३ गुलमोहर सोसायटी समोर आय व्ही इस्टेट वाघोली पुणे* हा आयव्ही इस्टेस्ट वाघोली येथे थांबलेला असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यास सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे . त्याची वैदयकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास कामी वाघोली पोलीस स्टेशन यांचे स्वाधीन करण्यात आले आहे .
सदरची कामगिरी निखिल पिंगळे पोलीस उपआयुक्त गुन्हे, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे-2, राजेंद्र मुळीक या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, गणेश डोंगरे, कीर्ती मांदळे यांचे पथकाने केली आहे.