कारेगाव येथे १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार

Bharari News
0
रांजणगाव गणपती प्रतिनिधी 
                रांजणगाव गणपती एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कारेगाव (तालुका शिरूर) येथे बाभुळसर रस्त्यावर दरोड्यासह सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना तक्रार दाखल होताच काही वेळात अटक केली आहे.
पुणे शहरातील स्वारगेट येथे काही दिवसांपूर्वी बलात्काराची घटना घडलेली असताना कारेगाव ता. शिरूर येथे सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. कारेगाव ( ता.शिरूर ) येथे दि. ०१.०३.२०२५ रोजी बाभूळसर रस्त्यालगत रात्रीच्या सुमारास १९ वर्षीय पीडित युवती आणि मामेभाऊ गप्पा मारत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकुचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देवुन हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जबरदस्तीने युवतीला मामेभावासोबत शरीर संबध करण्यास भाग पाडले आहे. हा सर्व प्रकार मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ चित्रित करून या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन नराधमांनी पीडित युवतीवर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना घडल्यानंतर आरोपींनी पीडित युवतीच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडित युवती आणि मामेभाऊ घरी आल्यानंतर बहिणीस घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित युवतीच्या बहीणीचे पती यांनी ११२ वर कॉल करून सदर प्रकाराची माहीती पोलीसांना दिली असता, पोलीसांनी घडलेल्या घटनेचा आढावा घेऊन अमोल नारायण पोटे ( वय. २५ वर्षे रा. संस्कृती डेव्हलपर्स पवार यांचे बिल्डींग मध्ये कारेगाव ता. शिरूर जि.पुणे मुळ रा. ढोकराई फाटा ता. श्रीगोदा जि. अहील्यानगर ) व किशोर रामभाऊ काळे ( वय २९ वर्षे रा संस्कृती . डेव्हलपर्स लेन नं. १ कारेगाव ता. शिरूर जि.पुणे मुळ रा. किल्ले धारूर ता.धारूर जि.बीड ) या दोघांच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या घटनेचा प्राथमिक तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सविता काळे करत आहेत.

 सदर कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनानुसार, महिला पोलीस अधिकारी सविता काळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस कर्मचारी वैभव मोरे, उमेश कुतवळ, अभिमान कोळेकर,दत्तात्रय शिंदे माऊली शिंदे, अजित पवार, संदीप मांड,संतोष अडसूळ, व महिला पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
     
सदर आरोपींना सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!