प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीवर महापुरुषांची बदनामी, धार्मिक भावना दुखावणे, सामाजिक व जातीय तेढ निर्माण झाले करणे व जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी या संदर्भात संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने वाघोली पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले,
प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल हिणकस व गलिच्छ वक्तव्ये करून बदनामी केली आहे. तसेच संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दलच्या अत्यंत विकृत लिखाणाचे समर्थन करून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. मराठा समाजाला शिवीगाळ करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन सदर व्यक्तीने ही वक्तव्ये व धमकी देत असल्याने हे प्रकरण संवेदनशील आहे.
प्रशांत कोरटकर या व्यक्तीने संबंधित ऑडिओ कॉलमध्ये पुढील वक्तव्ये केली आहेत :
१) ब्राह्मणांच्या शासनात तुम्ही काम करत आहे हे लक्षात ठेवा. २) बाजीप्रभू नसते तर तुमचा महाराज जीवंत नसता. ३) तुमचे महाराज पळून गेले. ४) जेम्स लेनचे पुस्तक वाचा, लोकांना सांगा जेम्स लेनने काय म्हटले आहे, व्हू इज बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, हे लोकांना सांगा. ५) ब्राह्मणांना कमी समजू नका, तुम्हाला ब्राह्मणांची ताकत दाखवतो, मग तुम्ही कितीही मराठे एकत्र करा. ६) छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालजी पेंढारकर हा ब्राह्मण होता, नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता माहीत पडलं नसतं. ७) *** रेकॉर्ड कर तुझ्या बापाला, ब्राह्मणांना बोलशील ना तर तुझी *** मारून टाकेन *** ८) ज्यादिवशी ब्राह्मणाचा शब्द काढशील त्यादिवशी परशुरामाचा परशू तुझ्या *** घुसवील *** ९) तुला तिथं येऊन मारीन. १०) तुला घरात येऊन मारीन ***..
सदर ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांच्या वॉलवर उपलब्ध आहे. राज्य सरकार, गृह विभाग व पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने वाघोली पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांना निवेदन देण्यात आले,
कोरटकर याच्या वक्तव्याची चौकशी करून त्याच्यावर, कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन वाघोली पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिले,
यावेळी संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, जिल्हा सचिव निलेश ढगे, जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष रणजित बिराजदार, गणेश बोरकर, लक्ष्मीपुत्र सरपंच, महिला आघाडी जिल्हाअध्यक्षा मोहिनी रणदिवे, उपस्थित होते, शिवद्रोही कोरटकर याच्यावर करवाई नाही झाली तर संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष ॲड मनोजदादा आखरे व महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला,