महिला दिन हा केवळ एक औपचारिकता नाही, तर महिलांच्या संघर्षाची, कर्तृत्वाची आणि त्यांच्या समाजातील योगदानाची आठवण करून देणारा दिवस आहे. इतिहासात पाहिले तर महिलांनी प्रत्येक क्षेत्रात अपूर्व कामगिरी करून दाखवली आहे—शिक्षण, विज्ञान, कला, राजकारण, उद्योग, क्रीडा आणि सामाजिक परिवर्तन यात महिलांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.असे प्रतिपादन निमगाव म्हाळुंगी चे सरपंच बापूसाहेब काळे यांनी महिलादिनी कार्यक्रमामध्ये व्यक्त केले,
तसेच आजही समाजात अनेक ठिकाणी महिलांना समान संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्न करावे लागतात. शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सुरक्षितता या क्षेत्रात महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागेल. "सबला नारी, सशक्त समाज" ही संकल्पना फक्त शब्दांत न राहता ती कृतीत उतरवण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवे.महिला केवळ कुटुंबाचीच नाही तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीची आधारस्तंभ आहेत. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला तिच्या कर्तृत्वाचा पूर्ण वाव मिळावा, तिला योग्य सन्मान मिळावा आणि तिने निर्भयपणे स्वप्ने पाहावी व ती पूर्ण करावी, यासाठी आपण कटिबद्ध राहिले पाहिजे.असेही सरपंच बापूसाहेब काळे यांनी कार्यक्रम प्रसंगी मत व्यक्त केले,
सदर कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सभागृहात महिलांना फेटे बांधून महिलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.तसेच महिलादिना निमित्ताने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित महिलांच्या वतीने तसेच निमगाव म्हाळुंगी चे विद्यमान सरपंच बापूसाहेब काळे,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक प्रभाकर लोखंडे,कृषी सहाय्यक अधिकारी जयश्री रासकर, निमगाव म्हाळुंगी चे माजी सरपंच राजेंद्र विधाटे,उपसरपंच प्रदीप पवार, ग्रामपंचायत सदस्य डॉ सचिन चव्हाण,एकनाथ लांडगे,ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले,दिलीपराव चव्हाण, नामदेव काळे, लहू विधाटे या सर्वांच्या शुभहस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .ग्रामपंचायत च्या वतीने स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवा निमित्ताने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आलेल्या सर्व महिलांना ग्रामपंचायत च्या वतीने सर्टिफिकेट आणि तुळशीचे रोप देऊन 'आदर्श माता' म्हणून गौरवण्यात आले,
त्याचप्रमाणे सध्याच्या युगात वाढती सायबर गुन्हेगारी कशाप्रमाणे रोखता येईल यावर महिलांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी शाखा व्यवस्थापक प्रभाकर लोखंडे यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले,
कार्यक्रम प्रसंगी निमगाव म्हाळुंगी चे सरपंच बापूसाहेब काळे,कृषी अधिकारी जयश्री रासकर,वैशाली चव्हाण, रंजना चव्हाण, कुसुम रणसिंग, चांगुणा शिंदे,इत्यादी मान्यवरांनी व महिलांनी आपली मनोगत व्यक्त केली,
सर्व महिलांना निमगाव म्हाळुंगी चे माजी आदर्श सरपंच राजेंद्र विधाटे यांनी खाऊ वाटप करून कांतीलाल चव्हाण यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती,
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी अपेक्षा टाकळकर, वसंत भागवत,नामदेव काळे,लहू विधाटे,शिवराज पवार, गणेश चव्हाण, युवराज चव्हाण, कृष्णा शिंदे, आर्यन चव्हाण, राजकुमार कांबळे, प्रथमेश कुटे, जयदीप चव्हाण, प्रणित कांबळे, अमोल धनवटे, प्रशांत चव्हाण आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले,
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच राजेंद्र विधाटे यांनी केले तर आभारप्रदर्शन दिलीप चव्हाण यांनी केले