सुनील भंडारे पाटील
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, स्वराज्याची दुसरी धर्म पंढरी, बलिदान पीठ, शक्तिपीठ, प्रेरणापीठ, श्री क्षेत्र वढू बुद्रुक (तालुका शिरूर) तसेच तुळापूर (तालुका हवेली) येथील धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ परिसरातील गावां मधील मटन,चिकन,दारू व्यवसाय हिंदू सणांच्या दिवशी बंद ठेवण्यात यावे यासाठीचे निवेदन जिल्हाधिकारी पुणे तसेच परिसरातील ग्रामपंचायत यांना देण्यात आले आहे,
धर्मवीर शंभूराजांचे बलिदान जगाच्या पाठीवर श्रेष्ठ आहे, धर्म बदलण्यासाठी औरंग्याने शंभूराजांना मरण यातना दिल्या, राक्षसी वृत्तीच्या औरंग्याला थोडी पण दया आली नाही, शंभूराजांनी हसत हसत मरण पत्करले, सद्यस्थितीत संपूर्ण जगात प्रदर्शित होत असणाऱ्या " छावा " चित्रपटाने ज्वलंत इतिहास समाजासमोर मांडला,
शंभूराजांचे बलिदान पाहता जगाच्या पाठीवर असा राजा होणे नाही, शंभूराजांचा इतिहास तसेच वढू बुद्रुक, तुळापूर या दोन गावांच्या भूमी पवित्र आहेत, येथील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी तसेच शंभू भक्तांच्या भावना जपण्यासाठी या भागातील मटन चिकन दारू दुकाने महत्त्वाच्या सणाच्या दिवशी बंद ठेवण्यात यावी यासाठी भरारी न्युज चे संपादक सुनील भंडारे पाटील, तसेच चंद्रशेखर घाडगे संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे व परिसरातील ग्रामपंचायतींना निवेदन देण्यात आले आहे,
या निवेदनामध्ये मकर संक्रांति, श्रीगणेश जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री, होळी, गुढीपाडवा, श्रीराम नवमी, हनुमान जन्मोत्सव, अक्षय तृतीया, धर्मवीर शंभूराजे पुण्यतिथी, वटपौर्णिमा, अंगारक संकष्ट चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, श्रीगणेश चतुर्थी, अनंत चतुर्थी, घटस्थापना, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, लक्ष्मीपूजन, श्रीदत्त जयंती, आदी सणांचा उल्लेख करण्यात आलेला असून वढू बुद्रुक, तुळापूर, कोरेगाव भीमा, आपटी, वाजेवाडी, पिंपळे जगताप, करंदी, सनसवाडी, डिग्रजवाडी, पेरणे, लोणीकंद, बकोरी, भावडी, मरकळ, फुलगाव, वढू खुर्द या ग्रामपंचायतींना लेखी स्वरुपात निवेदन देण्यात आले आहे, संबंधित ग्रामपंचायतीने तातडीने यावर ठराव घेऊन तशा सूचना दुकानदारांना देण्यात याव्या अशी मागणी परिसरातून होत आहे,