गुढीपाडव्याच्या दिवशी शंभूराजे समाधी स्थळावर शंभू भक्तांची गर्दी
धर्मपीठ, शक्तिपीठ, प्रेरणापीठ, बलिदान पीठ, स्वराज्याची दुसरी धर्मपंढरी श्रीक्षेत्र वडू बुद्रुक (तालुका शिरूर) पुणे येथील धर्मवीर श्री छत्रपती शंभुराजे समाधी, तसेच स्वामीनिष्ठ कवी कलश समाधीचे दर्शन घेण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या दिवशी देखील शंभू भक्तांनी गर्दी केलेली होती,
चाळीस दिवसांचा बलिदान मास संपल्यानंतर काल मृत्युंजय अमावस्येच्या दिवशी बलिदान दिवस पाळण्यात आला, संपूर्ण राज्यातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून शंभू भक्तांनी शंभूराजांच्या समाधीसमोर आपले मान झुकवली, व अभिवादन केले,
औरंग्याने कपटाने शंभूराजांना पकडून त्यांचे चाळीस दिवस हाल हाल केले, मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी औरंग्याने शंभूराजांना मरण यातना दिल्या, परंतु या गोष्टीला भीक न घालता शंभूराजांनी हसत हसत मरण पत्करले, शंभूराजांचा शिरच्छेद झाल्यानंतरचा हा दिवस बलिदान दिन म्हणून अत्यंत दुःखांकित अंतकरणांनी पाळण्यात येतो ,
या दिवशी शंभुराजांची निघालेली अंत्ययात्रा म्हणजे मूकपदयात्रा गावामध्ये काढण्यात येते, बलिदान दिवसाचे संपूर्ण नियोजन धर्मवीर शंभूराजे स्मृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, ग्रामपंचायत वढू बुद्रुक, समस्त ग्रामस्थ वढू बुद्रुक, मातृशक्ती वढू बुद्रुक, यांच्यावतीने करण्यात येते,
शंभू राजांचा धगधगता इतिहास छावा चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण जगापुढे आला असून शिवाजीराव सावंतांच्या छावा कादंबरीमुळे चित्रपटाला मोठा आधार मिळाला आहे, गेल्या महिन्याभरापासून समाधी स्थळी शंभू भक्तांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे,