वंचितांच्या हक्कासाठी रचनात्मक संघर्ष करणाऱ्या संतुलन संस्थेने आधार कार्डापासून वंचित बालकांसाठी भारतीय डाक विभागाच्या सहकार्याने संतुलन भवन खराडी पुणे येथे आधार मेळावाचे आयोजन करण्यात आले होते.
भारत सरकारने सर्वांसाठी आधार कार्ड सक्तीचे केल्याने सर्वांना आधार कार्डचा लाभ होत असला तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर काही घटक वंचित असून त्यांना आधार कार्डचा लाभ मिळावा यासाठी वेळोवेळी आधार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.
आज संतुलन भवन तुळजा भवानी नगर खराडी येथे भारतीय डाक विभाग आणि संतुलन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आधार कार्ड मिळायचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर मुलांचे नवीन आधार कार्ड, आधार कार्ड मधील दुरुस्त्या, आधार कार्ड अपडेशन याबरोबरच दहा वर्षापर्यंतच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनांची खाते करण्यात आली. कामगारांसाठी पॉलिसी ही उपलब्ध करून देण्यात आल्या. याचा मोठ्या प्रमाणावर संतुलन पाषाण शाळेचे विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.
आधार कार्ड मेळाव्या प्रसंगी बोलताना संतुलन संस्थेच्या संस्थापक संचालिका एडवोकेट पल्लवी रेगे यांनी संतुलन संस्थाविविध क्षेत्राच्या विकासासाठी रचनात्मक विकासात्मक कार्य करत असून आत्मसन्मान, आत्मनिर्भरता व सर्व समावेशक विकास यासाठी कार्यकरत असल्याचे मत मांडले. तसेच भारतीय डाक विभागाकडून वंचितां पर्यत पोहचण्यासाठी मिळत असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. डाक विभाग विविध प्रकारच्या योजना मार्फत समाज घटकासाठी काम करत असल्याचे मत मांडून कोणता घटक वंचित राहणार नाही यासाठी संतुलन संस्था सदैव तत्पर आहे. पुणे शहर व हवेली तालुका आधार प्रमुख संदीप रेपे यांनी संतुलन संस्थेच्या कार्याची प्रशंसा करून येथील पुढील काळात सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
पुणे शहर व हवेली तालुका आधार प्रमुख संदीप रेपे, वाघोलीचे पोस्ट मास्तर नामदेव गवळी व इतर सहकारी चाले सहकार्या बद्दल अँड बी.एम.रेगे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आधार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आदिनाथ चांदणे, नंदकुमार जाधव, पांडुरंग भालेराव, सुनिता गायकवाड, अश्विनी पात्रे, वैशाली वडोदे, दिपाली कोल्हे, सोनी जॉन, दीपक जॉन आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या प्रमाणावर संतुलन पाषाण शाळा विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.