तुळापूर मधील श्री खंडोबा देवस्थानची जमीन विकण्याचा ट्रस्टीचा डाव ग्रामस्थ आक्रमक पुजाऱ्यांचे तीव्र धरणे आंदोलन

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
             धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ श्रीक्षेत्र तुळापूर (तालुका हवेली) येथील नागरमल वस्तीतील डोंगरावर असलेले सुमारे 12 व्या शतकातील पुरातन मंदिराच्या दिवाबत्तीसाठी पुजारांना उदरनिर्वाहासाठी देण्यात आलेली जमीन सद्यस्थितीत असणारे देवस्थान ट्रस्ट व चेअरमन यांच्याकडून रडीचा डाव खेळला जात असून ही जमीन विकण्याच्या तयारीत असल्याचे काही पुरावे हाती लागले आहेत.

              श्रीक्षेत्र तुळापूर धर्मयोध्दे संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळापासूण जवळच प्राचीन काळातील श्री.नागरमल खंडोबा मंदिर आहे . ह्या देवस्थान वर धर्मादाय संस्थेची नोंद नाही , देवस्थान ची मोठ्या प्रमाणात शेत जमीन आहे. या देवस्थानची मांजरी बुद्रुक येथे 24 एकर तर तुळापूर येथे 25 एकर जमीन आहे.


                 मंदिराचे पुजारी हे धनगर समाजाचे अशिक्षीत लोक आहे . यांना धमकावून त्यांचा गैरफायदा घेत मधुकर घुले यांनी तुळापूर ग्रामस्थांना व पुजाऱ्यांना अंधारात ठेवून बेकायदेशीर चुकीचे पध्दतीने ट्रस्ट तयार केले. त्या नंतर मधुकर घुले यांनी मंदिरावर मनमानी कारभार सुरू केला आहे. (१) धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता परस्पर मांजरी बुद्रुक येथील शेत जमीनीचा विक्री व्यवहार करत आहे. व रक्कम रु. १० लाख एवढी विसार म्हणून स्वीकारली आहे. (२) ट्रस्ट तयार करताना बोगस कागदपत्रे सादर करुन धर्मादाय आयुक्तांची हि फसवणूक केली आहे. (३) मंदिरावर महिलांना अपमानास्पद वागणूक व भावनिकांना धक्का बुक्की दमदाटी करत आहे. (४) धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता.पारंपारिक अशी स्वयंभु मुर्ती काढून नवीन मुर्ती बसवण्याचा प्रयत्न केला होता.


                    संपत्तीच्या लोभापोटी संबंधित ट्रस्ट स्वतःचा मनमानी कारभार करत देवस्थानची जमीन लाटून ती विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याचे लक्षात आल्यानंतर देवस्थानच्या ठिकाणच्या स्थानिक पुजाऱ्यांनी या गोष्टीला विरोध करत देवस्थानच्या पायथ्याशी धरणे आंदोलन सुरू केले आहे, संबंधित ट्रस्ट तातडीने रद्द करून नवीन अध्यक्षांची निवड करण्यात यावी, तसेच देवस्थानच्या जमिनीची विक्री करून देऊ नये अशा स्वरूपाच्या मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आले आहेत.


              धरणे आंदोलनाचे निवेदन १.वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पो.स्टे, २.मा. धर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे रःमा. धर्मांदाय आयुक्त सोा, कार्यालय महाराष्ट्राज्य, मुंबई . प्रधान सचिव , विधी व न्यांय विभाग मुंबई ५. गृह मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबईं ३२, ६. पन्रकार भवन, पुणे यांना लेखी स्वरूपात देण्यात आले आहे.

(तुळापूर श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर घुले यांनी सांगितले की, न्यायालयीन कक्षेत देवस्थानच्या जमिनीसाठी माझा लढा गेले तीस वर्षे चालू आहे, त्यामुळे तर जमीन वाचली, मुळात मांजरी बुद्रुक येथील जमिनीचा ताबा कुळांकडे आहे, आणि तुळापूर येथील जमिनीचा ताबा तेथील पुजारी यांच्याकडे आहे, माझा जमीन विकण्याचा हेतू नाही, उलट जमीन वाचवण्यासाठी माझा लढा चालू आहे, त्यासाठी लाखो रुपये मी घालवले आहेत, आमच्या पूर्वजांनीच ही जमीन देवस्थानला दान म्हणून दिली होती)
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!