कृषी केंद्रात घुसून मालकावर कोयता व कात्रीने हल्ला करणाऱ्या तिघांना शिरूर पोलिसांची तातडीची कारवाई करत अटक केली आहे,
आरोपी परवेज पठाण, रूपेश चित्ते व ओंकार जाधव या तीन जणांना अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत,