सुनील भंडारे पाटील
वाघोली (ता हवेली) येथील जे.एस.पी.एम. भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक महाविद्यालयात दि. १८ एप्रिल २०२५ रोजी ‘प्रोजेक्ट एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन’ या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्याचा विकास करणे हे होते.या उपक्रमामध्ये यांत्रिकी, संगणक, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, स्थापत्य आणि विद्युत अभियांत्रिकी विभागांतील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
एकूण ११२ विद्यार्थी संघांनी पर्यावरणपूरक, तांत्रिक, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, स्मार्ट सोल्युशन्स तसेच सामाजिक उपयोगी अशा अनेक अभिनव प्रकल्पांची सादरीकरणे केले.
या स्पर्धेच्या परीक्षक मंडळात शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ डॉ. गायत्री भंडारी, डॉ. ए. जी. पाटील, डॉ. एस. सी. लाहुडकर, डॉ. पी. एस. टोपनवार, डॉ. व्ही. एस. दाभाडे, प्रा. कुंजीर एन. एम,डॉ योगेश सूर्यवंशी आणि प्रा. वृषाली पाटील यांचा समावेश होता.
त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे मूल्यांकन नवोपक्रम, तांत्रिक जटिलता, व्यावहारिक उपयोगिता आणि सादरीकरणाच्या गुणवत्तेच्या आधारे केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे विशेष कौतुक केले आणि उद्योगजगतातील गरजांच्या अनुषंगाने मार्गदर्शनही केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. देवकर यांच्या हस्ते झाले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य आणि संशोधनवृत्ती विकसित होते, तसेच त्यांच्या कल्पनाशक्तीला योग्य दिशा मिळते.”
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. देवकर, उपप्राचार्य डॉ. पी. टी. काळे, डीन अकॅडमिक्स डॉ. व्ही. एस. दाभाडे, संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. सोनाली गायकवाड, यांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एम. एस. यादव, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा. एन. ई. भुतेकर, स्थापत्य विभागप्रमुख प्रा. एम. एस. काश्मिरे, विद्युत विभागप्रमुख प्रा. एस. व्ही. पोखरखर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्रकल्प व विद्यार्थी संघ पुढीलप्रमाणे
स्थापत्य अभियांत्रिकी विभाग द लाइफ लाइन क्रॉसिंग ब्रिज डिजाईन फॉर पेडिस्ट्रीअन अँड ईमर्जनसी अँट अ फोर वे जंक्शन
विध्यार्थी संघ: मंगेश करखिले,यश गायकवाड ,धम्माधिना गायकवाड,साक्षी नीलकंठ
विजेत्या संघांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. देवकर, उपप्राचार्य डॉ. पी. टी. काळे, विभागप्रमुख आणि परीक्षक यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली. मार्गदर्शक प्राध्यापकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
या उपक्रमास वाघोली संकुलाचे संचालक डॉ. व्ही. एम. बुगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 'प्रोजेक्ट एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन' मध्ये मिळविलेल्या यशाबद्दल जे.एस.पी.एम संस्थेचे संस्थापक सचिव प्रा.डॉ.तानाजी सावंत,संस्थेचे उपाध्यक्ष गिरीराज सावंत यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आणि त्यांच्या यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.