पेरणे फाट्यावर पहाटेच्या सुमारास भंगार दुकानाला भीषण आग मोठे नुकसान

Bharari News
0
पेरणे फाट्यावर पहाटेच्या सुमारास भंगार दुकानात भीषण आग लागली. ५-६ दुकाने जळून खाक, गॅस सिलेंडरचा स्फोट,

 १२ सिलेंडर वेळेवर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र लाखोंचे नुकसान.

अनधिकृत भंगार दुकाने ठरत आहेत धोकादायक प्रशासनाची तातडीने कारवाईची मागणी.
सुनील भंडारे पाटील
            पुणे अहिल्यानगर मार्गावरील पेरणे फाटा (तालुका हवेली) येथे पहाटे तीनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तब्बल पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली. या आगीमुळे परिसरात भीषण स्फोटाचे आवाज ऐकायला मिळाले असून, नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली होती. 

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.ही आग एका भंगार दुकानात लागली असून, शेजारील सलून, टायर शोरूम, केटरर्स व सर्व्हिस सेंटर या आगीत पूर्णपणे भस्मसात झाले. 

विशेष म्हणजे केटरर्सच्या दुकानात ठेवलेले पाच गॅस सिलेंडर स्फोटाने उडाले, तर इतर बारा सिलेंडर वेळेवर बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत तीन कॉम्प्रेसरही आगीत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच PMRDA च्या अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या वेळी अग्निशमन कर्मचारी तसेच स्थानिक युवक यांनी आग विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

लोकवस्ती शेजारी असलेली ही आगीची घटना धक्कादायक असून, यानंतर पेरणे फाटा परिसरातील अनधिकृत भंगार दुकानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ज्वलनशील वस्तूंचा बिनधास्त साठा, गॅस सिलेंडरचा अयोग्य वापर आणि कोणतीही परवाना प्रणाली न पाळणारे हे दुकाने नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण करत आहेत. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!