सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटी नंबर २ च्या चेअरमनपदी डींग्रजवाडी येथील प्रवीण बाबुराव गव्हाणे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
ज्येष्ठ नेते आबासाहेब गव्हाणे व माजी सरपंच राहुल गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडणूक पार पडली. ठरलेल्या वेळेत राजीनामा देत इच्छुकांना काम करण्याची संधी देण्यात येत असल्याने कोरेगाव भिमा सोसायटीची निवडणूक एक आदर्श बनली आहे.
यावेळी माजी चेअरमन पंडित फडतरे, अशोक काका गव्हाणे, अनिल गव्हाणे, नागेश गव्हाणे, मा.व्हॉईस चेअरमन सारिका संभाजी गव्हाणे, रामदास कांबळे, संचालक अशोक नाबगे, महादेव फडतरे, बाळासाहेब वाडेकर, डिंग्रजवाडीचे माजी उपसरपंच मधुकर फक्कड गव्हाणे, बारीकराव गव्हाणे, बापूसाहेब मल्हारी गव्हाणे, मा.व्हा चेअरमन संभाजी पाटीलबुवा गव्हाणे, संस्थेचे सचिव मधुकर कंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते मछिंद्र गव्हाणे यांसह कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, वाडागाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोसायटी च्या इतिहास सर्वाधिक कमी वयाचे पहिले चेअरमन सन १९५८ साली कोरेगाव भीमा नंबर २ विविध विकास कार्यकारी सोसायटी ची स्थापना झाली. संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत कोरेगाव भीमा सह डिंग्रजवाडी मधील मातब्बर घराण्यांमधून चेअरमन व्हा चेअरमन पदासाठी निवड झाली. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वात कमी वयाचे शेतकरी कुटुंबातील प्रवीण गव्हाणे यांचे चेअरमन पदी निवड झाल्याने परिसरात कौतुकाचा विषय बनला असून सर्वाधिक कमी वयाचे चेअरमन म्हणून गव्हाणे यांची नोंद झाली आहे.