सुनील भंडारे पाटील
सिटी विस्टा खराडी येथील नामवंत कार्डिओलॉजिस्ट डॉ. तन्मय दिलीप यरमल (जैन) व ऑर्थोडेंन्टिस्ट डॉ. दिशा तन्मय यरमल (जैन) यांनी भगवान महावीर यांचे जयंती निमित्त त्यांचे हृदयम हेल्थकेअर क्लिनीक मध्ये जेष्ट दगडखाण कामगार व वृद्धांसाठी मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले.
वाढत्या महागाईमुळे बिगर औषधांने आजाराशी झुंझ देणारा अंगमेहनती कष्टकरी समाज व वृद्धापणात आधार नसलेले वृद्धांना उच्छभ्रू समाजासारख आपल्या हृदयाची तपासणी स्वखर्चाने करून घेणे शक्य नसल्याने. डॉ. तन्मय व हृदयम हेल्थ केअर च्या सर्व टीम नी भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक निमित संतुलन संस्था व सावली प्रतिष्ठान यांचे सहभागाने गोरगरिब कष्टकरी व वृद्धांच्या हृदयाची टीएमटी, २डी इको, इसीजी, ब्लड, शुगर आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या.
याप्रसंगी योगा प्रशिक्षक सुर्यकांत गोरे, संतुलन संस्थेच्या संस्थापिका अँड. पल्लवी रेगे, अँड बी. एम. रेगे, सावली प्रतिष्ठानच्या वैशाली घोलप यांनी हृदयम हेल्थ केअर क्लिनीकला शुभेच्छा दिल्या.
डॉ. तन्मय हे हृदयरोग तज्ञ आहेत व त्यांचे गोरगरीबांसाठी हृदय मोठे आहे. डॉक्टर बनण्यासाठी फार पैसा खर्च होतो म्हणूण वैद्यकीय क्षेत्राकडे बहुतांश: केवळ पैसे कमवण्याचा उत्तम व्यवसाय म्हणूण समजनाऱ्या डॉक्टरांची गरिब समाजाला गरज नसून डॉ. तन्मय सारखे मोठे हृदय असलेल्या तज्ञांची समाजात गरज असल्याचे मत अँड बी. एम. रेगे यांनी मांडले. अँड पल्लवी रेगे यांनी शुभेच्छा देत मोठ्या संख्येने मुले, कष्टकरी व वृद्धांची मोफत तपासणी केल्या बद्दल डॉ. तन्मय व डॉ. दिशा यांचे कौतुक केले.
डॉ. तन्मय व डॉ. दिशा यांनी हृदयम हेल्थ केअर च्या वतीने संतुलन व सावली प्रतिष्ठानला औषधाची पेटी, फुल झाड व भेट वस्तू देऊन यथोचित सन्मान केला व सर्व उपस्थितांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.