वाघोलीतील गायरान जमिनीवरील अतिक्रमितांना मालकीहक्काच्या जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
वाघोली (ता. हवेली, जि. पुणे) येथील सरकारी गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या दगडखाणकामगार आणि त्यांच्या कुटुंबांना घरासाठी मालकीहक्काची जागा मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 1 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
दगडखाण असंघटित कामगार विकास परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणाचे निवेदनाच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. या निवेदनात मौजे वाघोली येथील गट क्र. 129, 1123, 1419 आणि 1567 या गायरान शासकीय जमिनींवर राहणाऱ्या अतिक्रमणधारक दगडखाणकामगार कुटुंबांना घरासाठी मालकीहक्काची जमीन देण्याची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. डुडी यांनी पुणे यांनी २०१८ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अतिक्रमणधारकांची यादी गटविकास अधिकारी हवेली यांचेकडून प्राप्त करून घेऊन अंतिम पात्र लाभार्थ्यांचा यादीसह जगेचा मागणी प्रस्ताव १५ दिवसात कार्यालयास सादर करावयास पुणे महानगरपालिकेला आदेश दिले आहेत.
वाघोली ग्रामपंचायतीने घरपट्टी आकारण्याच्या घाईत ०१ जानेवारी २०११ पूर्वीची केवळ ८४५ कुंटुंबे दाखवली असून घरांच्या क्षेत्रफळाच्या नोंदी अनानोंदी व अपारदर्शक पद्धतीने केल्या होत्या. या सर्वेमुळे अंदाजे आर्ध्याहून अधिक अतिक्रमण धारकांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे तसेच चुकिच्या भूखंड क्षेत्रफळाच्या नोंदीमुळे शासन निर्णयाच्या तरतुदीतील लाभापासून बहुतांश अतिक्रमण धारकांवर अन्याय होणार हे लक्ष्यात येताच
दगडखाण कामगार परिषदेने शक्ती प्रदक्त समितीकडे फेर सर्वेक्षणाची मागणी केली. त्यानुसार उच्चस्थरीय पाच पथकांव्दारे वाघोलीतील अतिक्रमण धारकांचा फेर सर्वेक्षण करण्यात आला होता. या फेर सर्वेकनाची यादी जाहिर करून करावी यासाठी पंचायत समिती हवेलीचे गटविकास अधिकारी यांना 2 जानेवारी २०२५ रोजी परिषदेने निवेदन ही दिले आहे.
महत्वपूर्ण निर्णायक बैठकीला दगडखाणअसंघटित कामगार परिषदेचे अध्यक्ष अॅड. बी. एम. रेगे, अँड पल्लवी रेगे यांच्यासह, निवासी उपजिल्हाधिकारी, सहायक आयुक पुणे महानगरपालिका, अपर तहसिलदार, उपअभियंता पुणे मनपा, गटविकास अधिकारी हवेली, तहसीलदार महसूल नायब तहसिलदार दौड यासह परिषदेचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून गायरान जमिनीवर राहणाऱ्या दगडखाणकामगार कुटुंबांना हक्काच्या घरासाठी हक्काची जागा मिळव्याचे दिशेने आशेचा किरण दिसू लागला आहे.
बैठकीस जिल्ह्यातून अंबादास साळुंके, अनिकेत मोहिते, मऱ्याप्पा चौगुले, प्यारेलाल जाठव, संजय शिवशरण, बळीराम पवार, संदिप मोरे, गणीभाई सय्यद, रईस शेख, कांताबाई पवार, ललीता चौगुले, नंदकुमार जाधव व मोठ्या संख्येने दगडखाण कामगार व अदिवासी प्रतिनिधी उपस्थित होते.