धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढू बुद्रुक (तालुका शिरूर) गावचे तरुण तडफदार हुशार व्यक्तिमत्व असणारे पोलीस पाटील जयसिंग भंडारे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुणे ग्रामीण पोलीस खात्याच्या वतीने त्यांना गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,
उल्लेखनीय कामगिरीबद्दल कायम चर्चेत असणारे तसेच गावामधील वादग्रस्त काही प्रश्न जबाबदारी पूर्वक हाताळणारे समजूतदार तसेच ग्रामस्थांना कायम मदतीची भावना असणारे, पोलीस पाटील यांची नियुक्ती शासकीय पोलीस पाटील परीक्षा चाचणी मधून उच्च गुणवत्तेमधून झालेली असून त्यांनी पोलीस पाटील पदाची जबाबदारीपूर्वक कामकाज चालवले आहे त्यामुळे त्यांनी लोकांच्या मनात आपले घर केले आहे,
पाषाण चव्हाणनगर पुणे येथे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) सुनील फुलारीसाहेब यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट कामगिरीसाठी, गौरवण्यात आले. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख साहेब, बारामती अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साहेब, महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील व पुणे जिल्ह्यातील पोलीस दलातील अधिकारी वर्ग व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.