शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून 100 टक्के अध्यापन व संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
           कोरोना काळात गेली दोन वर्षे ७५ टक्के अभ्यासक्रम व त्यावर आधारीत परीक्षा असे धोरण शासनाने व राज्य मंडळाने जाहीर केले होते. मात्र चालू वर्षी जून पासून शाळा नियमित सुरू झाल्याने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून १०० टक्के क्षमतेने अध्यापनाचा निर्णय शासनाने दि.२४ जून २०२२ च्या परिपत्रकानुसार घेतलेला आहे.        
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) ने शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. यासंदर्भात बोलताना फेडरेशनचे अध्यक्ष डि.व्ही.कानडे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाच्या अडचणी लक्षात घेता शाळा व अभ्यासक्रम १०० टक्के क्षमतेने लागु करण्याचा निर्णय कालसुसंगत म्हणावा लागेल.तसेच सन २०२०-२१ मधील इयत्ता पहिली साठी राज्यातील आदर्श शाळात प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी ठरलेल्या  (मराठी व उर्दू माध्यम) "एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके" उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची शैक्षणीक अंमलबजावणी इयत्ता पहिलीसाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून करण्यात येणार आहे. टप्या- टप्प्याने पाचवी पर्यंतच्या वर्गासाठी २०२६-२७ पर्यंत सर्व शाळात दि.२३ जून २०२२ रोजीच्या परिपत्रकानुसार ही कार्यवाही करण्यात येणार आहे. उच्च प्राथमिक ते उच्च माध्यमिक गणित व विज्ञान हे विषय इंग्रजीमध्ये अभ्यासले जातात. प्राथमिक शिक्षण विद्यार्थी जीवनातील अनेक भाषा आत्मसात करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. मुलांचे भाव विश्व डोळ्यापुढे ठेवून त्यांना प्राथमिक शाळेपासून इंग्रजी शब्दांची ओळख होण्यासाठी शासनाच्या वतीने राज्यातील प्राथमिक स्तरावर अध्ययनासाठी एकात्मिक व द्वि भाषिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा घेतलेला निर्णय ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतो ; शिवाय या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासही मदत होईल. त्यामुळे महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक (फेडरेशन) विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या  निर्णयाचे स्वागत केले आहे.एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकांचा आवश्यक अभ्यासक्रम एससीईआरटी तयार करील. तसेच त्यावर आधारित पाठ्यपुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ (बालभारती) पुणे तयार करून राज्यातील  समग्र शिक्षा योजनेतील  सर्व शाळांना वितरित करण्याची जबाबदारी पार पाडेल. शिवाय समग्र शिक्षा योजने बाहेरील शाळांनाही पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती)कडून बाजारात खुल्या विक्रीसाठी एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील असेही कानडे यांनी सांगितले.

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!