राज्यामध्ये राजकीय वर्तुळात अस्थिरता

Bharari News
0

सुनील भंडारे पाटील

           महाराष्ट्र राज्यात सद्यस्थितीत चालू असलेल्या राजकीय वर्तुळा मधील घडामोडींमुळे जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण, सत्ता घालवणे, सत्ता स्थापन करणे, यासाठी चाललेल्या आमदारांच्या रस्सीखेच मध्ये राजकीय खेळीकडे मात्र लोकांनी बघ्याची भूमिका घेतली आहे,            
राज्यामध्ये गेल्या अडीच वर्षापासून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांचे महा विकास आघाडी सरकार असून शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी तसेच वादविवाद यामुळे फूट पडली असल्याने बाळासाहेब ठाकरे व  हिंदुत्ववादी विचारधारा सांगणारा एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट पक्षातून  बंडखोरीच्या मार्गावर आहे, याचा फार मोठा तोटा महाविकास आघाडीला होणार असून भविष्यात असे झाले तर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे , त्याप्रमाणे शिंदे गटाची भूमिका या नंतरच्या कालावधीत काय असेल या चर्चेला सध्या सर्वत्र उधाण आले आहे, शिवसेनेमध्ये सध्या सेना गट व शिंदे गट यांच्यामध्ये अगदी अटीतटीच्या एकमेका वर धारदार शब्दांनी शस्त्र संधान साधले असून आता यांचे जुळेल काय? यानंतरची शिंदे गटाची भूमिका काय असेल हा खरा कळीचा मुद्दा ठरणार आहे, राज्यामध्ये  राजकीय वर्तुळात अस्थिरता असल्याने तसेच या चालू घडामोडी मुळे जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे मात्र लोक नेत्यांचे दुर्लक्ष होत चालले आहे,
            राज्यात सद्यस्थितीत गेल्या दोन वर्षापासून महागाईचा उच्चांक रेकॉर्डब्रेक झाला असून, लोकांना जगणे मुश्कील झाले असताना, राजकीय पटलावर मात्र जनतेच्या प्रश्नांकडे, अडी  अडचणींकडे, लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही, जनतेला कोणीच वाली नाही अशी एकंदरीत परिस्थिती झाली आहे, अशाच स्वरूपाच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे,
            राज्य स्तरावर राजकीय वर्तुळात चाललेल्या भानगडींमुळे  आळंदी ते पंढरपूर चाललेल्या भव्य अशा पालखी सोहळ्याकडे संपूर्ण राज्यातील मीडियाने, लोकनेत्यांनी, पाठ फिरवली आहे तसेच जनतेचे देखील काहीसे दुर्लक्ष केले आहे, संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, बरोबर राज्यातून नऊ मोठ्या पालख्यांचे प्रस्थान सध्या पंढरपूर कडे चालू आहे, गाव गावच्या असंख्य पालख्यांबरोबर हजारो वारकरी पाई वारीत सहभागी झाले आहेत,

 

 

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!