सुनील भंडारे पाटील
राज्य मराठी पत्रकार परिषदेची केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारणी जाहीर रांजणगाव गणपती(ता.शिरूर) येथे महागणपती ट्रस्ट सभागृहात राज्य मराठी पत्रकार परिषद,महाराष्ट्र प्रदेश या पत्रकार संघटनेच्या शिरूर तालुक्याच्या वतीने आयोजित पुणे जिल्हास्तरीय बैठक व शिरूर तालुका,खेड तालुका,इतर तालुके कार्यकारणी निवड समारंभ राज्य मराठी पत्रकार परिषद,महाराष्ट्र प्रदेशचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे साहेब,पुणे जिल्हाध्यक्ष विजयराव लोखंडे,जिल्हा उपाध्यक्ष सुनील भंडारे पाटील,जिल्हा सहसंघटक साहेबराव आव्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यामध्ये राज्य मराठी पत्रकार परीषद,महाराष्ट्र प्रदेशच्या पुणे जिल्हा मुख्य संघटकपदी अरूणकुमार मोटे,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदी विजय थोरात,जिल्हा सचिव पदी शंकर पाबळे,तसेच खेड(राजगुरूनगर) तालुकाध्यक्ष पदी गौतम लोखंडे,खेड ता.उपाध्यक्ष गणेश वाळुंज,हवेली तालुका कार्याध्यक्ष पदी प्रीती पाठक,दौंड तालुकाध्यक्ष पदी हरिभाऊ बळी,शिरूर ता.सचिव शौकत शेख,शिरूर ता.खजिनदार एकनाथ थोरात,खेड(राजगुरूनगर) ता.कार्याध्यक्ष मनोहर गोरगल्ले,खेड ता.सचिव दिपक बोबले,खेड ता.खजिनदार देवेंद्र ओव्हाळ,खेड ता.सहसचिव संतोष फडके,खेड ता.सहखजिनदार सुनील वाघचौरे,खेड ता.संपर्क प्रमुख जगदीश बल्लाळ,शिरूर सदस्य सुजित मैड,खेड सदस्य संजय दाते,विकास शिंदे,संतोष सायकर,चंद्रकांत भालेकर आदींची निवड करण्यात आली.
याप्रसंगी पुणे जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा निवड/नियुक्तीपत्र देवून सन्मान राज्य मराठी पत्रकार परिषद,महाराष्ट्र प्रदेशचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे साहेब,पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष विजयराव लोखंडे,जिल्हा उपाध्यक्ष सुनील भंडारे पाटील,शिरूर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील,पत्रकार परिषदेचे शिरूर तालुकाध्यक्ष साहेबराव लोखंडे,सविंदणेचे सरपंच वसंत पडवळ,उपसरपंच अभिजित लंघे,पत्रकार परिषदेचे सहसंघटक साहेबराव आव्हाळे,हवेली तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटेकर यांच्या हस्ते पार पडला.यावेळी आदी संघटनेचे विविध पदाधिकारी,पत्रकार,मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये उपस्थित पदाधिकारी,पत्रकारांना प्रमुख मार्गदर्शन राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी केले.या बैठक व कार्यकारणी निवड समारंभ कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शिरूर तालुकाध्यक्ष साहेबराव लोखंडे,नवनिर्वाचित जिल्हा संपर्क प्रमुख विजयराव थोरात,सह तालुका पदाधिकारी,सदस्यांनी उत्तम दर्जाचे करून परिश्रम घेतले.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विजयराव लोखंडे,सूत्रसंचालन जिल्हा संपर्क प्रमुख विजय थोरात,स्वागत जिल्हा उपाध्यक्ष सुनील भंडारे,आभार शिरूर तालुकाध्यक्ष साहेबराव लोखंडे यांनी मानले.