सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनच्या पावसाने दडी मारली, वेळेत पाऊस न झाल्याने शेतकरी, ग्रामस्थ, नागरिकांची चिंता वाढली
पर्यावरण समतोल राखण्यासाठी वेळेत पावसाची गरज आहे, शिवाय पुणे शहराच्या आसपास ग्रामीण भाग हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून असून, तसेच वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढल्याने आता मात्र लोकांची चिंता वाढू लागली आहे, दरवर्षी पेक्षा पावसाचे प्रमाण यावर्षी कमी असून, दसरा दीपावली, शिमगा या कालावधीत परतीच्या पावसाची जोरदार हजेरी असते, परंतु यावर्षी परतीचा पाऊस सोडाच, मान्सून पूर्व पावसाने देखील दडी मारल्याने, शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे, पाऊस न झाल्याने पिकावर परिणाम झाला असून, खरीप पिकाची पेरणी लांबली आहे, वाढत्या उष्णतेमुळे गेले तीन महिने जनजीवन विस्कळीत झाले आहे, पाऊस कधी पडतोय या आशेने शेतकऱ्याचे मात्र आकाशाकडे लक्ष लागले आहे, गेले आठ दिवस प्रखर ऊन, व आकाशातील ढगांचा लपंडाव जणू जवळ येऊन गेलेला पाऊस लोकांना हुलकावणी देत आहे,