हवेली: ज्ञानेश्वर पाटेकर
नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेने साधारण महिन्यापूर्वी पुण्यामध्ये न भूतो न भविष्यती असा शिंपी समाजातील सर्व पोट जातींसाठी वधू वर सूचक राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला होता, त्या मेळाव्यातील वधूवर सुचीचा प्रकाशन सोहळा महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. श्री. विलास कानडे यांचे शुभहस्ते व नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष मा. श्री संजीव तुपसाखरे यांचे अध्यक्षतेखाली मलबार ज्वेलर्स, लक्ष्मी रोड,येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी पुणे शहराध्यक्ष संदिप लचके, सचिव सुभाष मुळे बांधकाम व्यावसायिक मनोज मांढरे, निमंत्रक दिलीपकुमार वायचळ व सुभाष पांढरकामे, नितीन पंडीत, ना.स.प चे विश्वस्त ज्ञानेश्वर पाटसकर व वसंतराव खुर्द, कोषाध्यक्ष राजाभाऊ पोरे, सौ. दिक्षा देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अतिशय देखणा व संस्मरणीय संपन्न झाला.
विवाह जमविण्याचे शुभ कार्य पूर्वी वडील धारी मंडळी आत्मीयतेणे करीत होते. परंतू त्यांची उणीव आज आपणाला जाणवत आहे. त्यामुळेच आज वधूवर मेळाव्याची अत्यंत गरज असल्याचे मत पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. श्री. विलास कानडेसाहेब यांनी व्यक्त केले तर विवाह जुळवण्यासाठी कोरोना मुक्तीनंतर प्रथमच मेळाव्याचे उत्तम आयोजन केल्याबद्दल नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजीवजी तुपसाखरे यांनी पुणे शहर शाखेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी रमेश मेहेर, मोहन गाढवे, भारत चिंबळकर, शिरीष मोहिते, एकनाथ सदावर्ते, दिपकशेठ नेवासकर, नितीन उत्तरकर, दिलीप उपरे, महेश मांढरे, सौ. रेखाताई गाडेकर, कैलास नेवासकर, अड. सतीश कांबळे, प्रशांत भोंडवे, योगेश मांढरे, कैलास देवळे, शैलेश मुळे, दिंगबर क्षीरसागर, विनायक घाटे, मनोज जवळकर, सतीश कोळेकर, पुणे शहरातील ज्ञातीसंस्थाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांचसह ना.स.प. पुणे शहर कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व समाज बंधूभगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वधूवर मेळावा व सुची प्रकाशन सोहळ्यास योगदान दिल्याबद्दल अक्षय मांढरे, दुर्गेश खुर्द, सौ. विजया कालेकर यांचे व स्वामी एंटरप्रायझेसच्या मनिषा धोंगडे यांनी उत्तम प्रकारे मुख्यपृष्ठासह सुची वेळेत पूर्ण केलेबद्दल या सर्वांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत सातपुते आभार प्रदर्शन अक्षय मांढरे यांनी केले. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली