ओंकार ऊर्फ राण्या बानखेले खुन प्रकरणातील फरार आरोपी संतोष जाधव यास साथिदारासह अटक

Bharari News
0

 सुनील भंडारे पाटील

                  मंचर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ४५९/२०२१, भा.दं.वि. कलम ३०२, १२०(ब), ३४, शस्त्र अधिनियम कलम ३, २५
२७, सह मोक्का कलम ३(१)(ii), ३(४) हा गुन्हा संतोष सुनिल जाधव याने त्याचे साथिदारांसह मिळून ओंकार ऊर्फ राण्य आण्णासाहेब बाणखेले याचा पिस्टलमधून गोळीबार करून खुन केलेबाबत गुन्हा दाखल होता. नमुद गुन्हयातील मुख आरोपी संतोष सुनिल जाधव हा फरारी असलेबाबत न्यायालयाने जाहीरनामा काढला होता व त्याचे अटकेकरीता अट वॉरंट काढण्यात आलेले होते. 
 

             जाधव हा विविध राज्यात सतत फिरत असल्यामुळे त्याची माहिती काढून त्या पकडणे हे आव्हानात्मक होते. यापूर्वी दिनांक ०७/०६/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जाधव याला फरार कालावधीत आसरा दिल्यामुळे सौरभ ऊर्फ सिध्देश ऊर्फ महाकाल हिरामण कांबळे यास अटक केलेली होती. सौरभ ऊर्फ महाकाल याचेकडून माहिती काढून संतोष जाधव यास पकडणेकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मा, अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग श्री. मितेश घट्टे मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग श्री सुदर्शन पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक श्री. अशोक शेळके, स.पो.नि. नेताजी गंधारे, पो. स. ई. गणेश जगदाळे, पो. हवा. दिपक सावळे, पो. हवा. राजू मोमीन, पो. हवा. विक्रम तापकीर, पो. हवा. जनार्दन शेळके, चा. पो. हवा, प्रमोद नवले, पाथरकर, पो.ना. संदिप वारे, पो. ना. बाळासाहेब खडके, पो.ना. अमोल शेडगे, पो. कॉ. अक्षय नवले, पो. कॉ. निलेश सुपेकर, पो. कॉ. दगडु वीरकर यांचे पथकास सुचना दिल्या होत्या.


                         नमुद पथकाने सौरभ ऊर्फ सिध्देश ऊर्फ महाकाल यांच्याकडून अटक मुदतीत माहीती घेतली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास संतोष सुनिल जाधव हा त्याचा मित्र नवनाथ सुरेश सुर्यवंशी, रा. स्वामी नारायण मंदीराचे समोर, मांडवी, ता मांडवी, जि भुज, राज्य गुजरात यांचेकडे असलेबाबत माहिती प्राप्त झाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथक तात्काळ मांडवी, गुजरात येथे गेले व तेथे त्यांना नवनाथ सुर्यवंशी हा मिळून आला व त्याच्याकडे संतोष जाधव याचेबाबत विचारपुस केली असता सुरवातीस त्याने माहिती दिली नाही परंतु त्यास कौशल्यपूर्वकरित्या विश्वासात घेतले असता त्याने संतोष जाधव वास मौजे नागोर, ता. मांडवी, जि. भुज, गुजरात येथे त्याचे ओळखीचे ठिकाणी ठेवले असल्याची माहिती दिली व त्याचे राहण्याची, जेवण्याची सोय केली असल्याचे सांगितले तसेच त्यास स्वतः चे सिमकार्ड वापरण्यास दिल्याचे सांगितले त्यानुसार मोक्का गुन्हयातील फरार आरोपी संतोष सुनिल जाधव यास मौजे नागोर, ता. मांडवी, जि. भुज, गुजरात येथून ताब्यात घेण्यात आले आहे. संतोष जाधव याने त्याची ओळख लपविण्याकरीता डोक्याची पुर्ण केस काढून स्वतःचा संपुर्ण पेहराव बदलेला असल्याचे दिसून आले आहे. संतोष सुनिल जाधव हा खुनासह मोक्का या गुन्हयात फरार असताना त्यास नवनाथ सुरेश सुर्यवंशी याने आसरा दिलेला असल्यामुळे त्यास व गुन्हयातील मुख्य आरोपी संतोष सुनिल जाधव यास मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील, खेड विभाग, खेड यांनी खातरजमा करून दिनांक १२/०६/२०२२ रोजी गुन्हयात अटक केलेली आहे. आरोपी संतोष सुनिल जाधव हा अंतरराज्य टोळीतील सदस्य असल्यामुळे त्यास पोलीसांची चाहुल लागल्यास परागंधा होण्याची शक्यता होती व त्यास अटक करणे मुश्कील झाले असते त्यामुळे पोलीस विभागाकडून संतोष जाधव याच्या अटकेची संपूर्ण मोहिम ही अतिशय गोपनीय पध्दतीने राबवून यशस्वीरित्या पार पाडली आहे. संपुर्ण कारवाई दरम्यान मा. श्री. कुलवंत कुमार सरंगल सो., अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. श्री. मनोजकुमार लोहिया साो. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे.



सदर गुन्हयातील मुख्य आरोपी नामे संतोष सुनिल जाधव याचेवर १) मंचर पो.स्टे. गु. रजि. नं. ११८/२०१७, भादवि कलम ३०७,१२० (ब), २०१,३४, २) मंचर पो.स्टे.गु. रजि. नं. ४६३/२०२१, भादंवि कलम १२० (ब), शस्त्र अधिनियम कलम ३,२५, जुवेनाईल जस्टीस अॅक्ट कलम angle3(7),3) मंचर पो.स्टे.गु. रजि.नं. ९४०/२०१९, भा.दं.वि. कलम ३६३.३७६, पॉक्सो अॅक्ट कलम 6,6,6,87,r) मंचर पो.स्टे.गु. रजि.नं. ४५९/२०२९, भा.दं.वि. कलम ३०२,१२० (ब). ३४. शस्त्र अधिनियम कलम ३,२५,२७, ५) मंचर पो.स्टे. गु. रजि. नं. १०७/२०२२, भादंवि कलम ३८४,३८५,५०६, ३४ असे गुन्हे दाखल आहेत..

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!