रांजणगाव गणपती, संभाजी गोरडे
.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांमध्ये मध्ये काम करणारे अनेक कामगार एका खोलीत ३ ते ४ कामगार राहत असतात. प्रत्येक कामगाराची कामाच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने कामावर जाताना ते रुमचा दरवाजा ऊघडा ठेउन कामावर जात असतात आणि याचा फायदा मोबाईल चोरणारे चोरटे घेउन झोपलेल्या कामगाराचे खोलीतुन त्याचे मोबाईल चोरी करुन चोरटे पोबारा करतात
बरेच दिवस मोबाईल चोरीच्या घटणा घडत असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी तपास पथकातील सहा फौजदार दत्ताञय शिंदे, पो काँ उमेश कुतवळ, पो काँ विजय शिंदे यांना योग्य त्या सुचना देउन मोबाईल चोरीचे गुन्ह्याचा छडा लावण्यास सांगितले.. त्यावरुन तपास पथकातील सहा फौजदार दत्ताञय शिंदे, पो काँ उमेश कुतवळ, पो काँ विजय शिंदे यांनी रांजणगाव गणपती येथे सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे संशयितास ताब्यात घेउन विचारपुस केली असता त्यांने रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवी परिसरातील खोल्यांमधुन अनेक मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. सदर चोरट्या कडुन पोलीसांनी ४,५०,०००/- रु किमतीचे ४० महागडे मोबाईल फोन जप्त केले असुन रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहा मोबाईल चोरीचे गुन्हे उघड झाले आहे व उर्वरित मोबाईल चे आयएमईआय नंबर वरुन मोबाईल मालकाचा शोध घेउन गुन्हे दाखल करण्याचे काम चालु आहे
सदरची कारवाई ही मा अभिनव देशमुख सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रा, मा मिलंद मोहीते सो अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, मा यशवंत गवारी सो उपविभागिय पोलीस अधिकारी शिरुर विभाग शिरुर, यांचे मार्गदर्शना खाली रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोसई सुहास रोकडे, सहा फौज दत्ताञय शिंदे, पो काँ उमेश कुतवळ, पो काँ विजय शिंदे, पो हवा सुनिल नरके, पो हवा वैभव मोरे, पो काँ रघुनाथ हळनोर, यांनी केली असुन पुढील अधिक तपास सहा फौजदार दत्ताञय शिंदे व पो हवा सुनिल नरके हे करत आहे.