सुनील भंडारे पाटील
पुणे-नगर महामार्गावर कोरेगाव भीमा (ता शिरूर ) येथील ड्रिलको सेको कंपनी समोर, भरधाव वेगाने जाणारा ट्रक रस्त्याच्या खाली खड्ड्यात उतरून एका विजेच्या खांबाला उलटून धडकला सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही,
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालक कानसिंग खूमसिंग राऊत वय 39 रा कोरेगाव भीमा, तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार उर्मी तालुका बरोरा जिल्हा चंद्रपूर,त्याच्यावर गुन्हे दाखल केले असून, रात्रीच्या वेळी संबंधित ठिकाणी जी जे 12 बी वाय 8909 हा ट्रक कोरेगाव भीमा कडून सणसवाडी दिशेने भरधाव वेगाने जात असताना वाहन चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडली विजेचा खांब पूर्णपणे वाकून तारा देखील तुटल्या, यामध्ये ट्रक चालक किरकोळ जखमी झाला, याविषयी विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ कैलास गोडाम यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हे दाखल केले आहेत, सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने करीत आहेत,
. पुणे-नगर महामार्गावर बेशिस्त ट्रक,डंपर, खाजगी प्रवासी बसेस, बेशिस्त चालक यांना शिस्त लावण्याची गरज आहे, बेशिस्त चालकांमुळे आतापर्यंत अनेक अपघात घडले, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले,