सुनील भंडारे पाटील
शक्तीपीठ, धर्मपीठ, श्रीक्षेत्र वढू बुद्रुक ( ता शिरूर ) येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज 365 वी जयंती मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली,
आज शनिवार ता 11 जयंती कार्यक्रमानिमित्त शुक्रवार ता 10 रोजी भव्य अशा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये सुमारे 300 बैलगाडे सहभागी झाले , फळीफोड घाटाचा राजा हा एक नंबरचा मान अनिल मनोहर ढमढेरे तळेगाव ढमढेरे (12 सेकंद ) यांच्या बैलगाड्या ने मिळवला, प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकास रोख स्वरूपात बक्षिसे ठेवण्यात आली होती,
आज शनिवार जयंतीदिनी सकाळी किल्ले पुरंदर या ठिकाणाहून शौर्य ज्योत आणण्यात आली, श्रीमंत छत्रपती वृषालीताई भोसले, जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे, ज्योती पाचुंदकर, सभापती मोनिका हरगुडे, उपसभापती सविता पऱ्हाड , यांच्या उपस्थितीत समाधीचे पूजन, पाळणागीत, रसिका सणस व हांडे महाराज यांचे व्याख्यान, संगीत भजन, महाप्रसाद, सायंकाळी भव्य मिरवणूक पार पडली, कार्यक्रमाचे नियोजन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज युवामंच, ग्रामपंचायत वढू बुद्रुक, समस्त ग्रामस्थ वढु बुद्रुक, यांनी केले होते, यावेळी स्मृती समिती अध्यक्ष सोमनाथ भंडारे, युवा मंच अध्यक्ष अनिल भंडारे, सरपंच सारिका शिवले, उपसरपंच राहुल कुंभार, लाला तांबे, संतोष शिवले, रमाकांत शिवले, रेखा शिवले,अंकुश शिवले, अनिल शिवले, उमेश भंडारे, सचिन भंडारे, अनिल गोरक्ष भंडारे,अक्षय भंडारे, प्रवीण भंडारे, विनोद भंडारे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते, याप्रसंगी महाप्रसाद अन्नदान केलेल्यांना शंभू प्रतिमा भेट देण्यात आली,