सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व वळवाच्या पावसाची हजेरी, शेतकऱ्यांमध्ये समाधान, नागरिकांची अनेक दिवसांच्या उन्हाळी उष्णतेपासून सुटका,
गेल्या आठवड्यापासून आकाश ढगाळमय झाले असून उष्णतेची थोडी तीव्रता वाढली होती, परंतु गेल्या दोन-तीन दिवसापासून जिल्ह्याच्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस झाल्याने जीवसृष्टीसाठी वातावरण चांगले झाले आहे, शिवाय वातावरण थोडे पहिल्यापेक्षा थंड झाल्याने लोकांनी सुटकेचा श्वास सोडला, जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या दरवर्षीप्रमाणे एप्रिल,मे, जून या महिन्यात उभी असताना, पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे, शेती क्षेत्रात पाण्यावाचून जळू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे, काही भागातील विंधन विहिरी, शेत विहिरी यांची पाणी पातळी वाढू लागली आहे, पावसाला थोडा उशीर झाल्याने उन्हाळी बाजरी भुईमूग पिके काढणी पूर्ण झाली असून संबंधित होणारे नुकसान थांबले आहे, यापुढील ऊस, हंगामी पिके, तरकारी याला मात्र हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे,