सुनील भंडारे पाटील
धानोरे येथील जि.प. शाळेत मुख्याध्यापक शंकर शिंदे , भुजबळ सर व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे पुष्प वह्या गणवेश देवून स्वागत केले,
मुलामध्ये उमेद , जिद्द , अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी म्हणून हभप ज्ञानेश्वर मिडगुले यांनी गरीबांचा मुलगाच मोठा होऊ शकतो हे नंदूरबारच्या भिल्लाचा मुलगा व करमाळ्याच्या वडारी समाजाचा मुलगा मनात महात्वाकांक्षा निर्माण झालेवर कसा कलेक्टर बनला ते सांगून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला,
नियमीत वेळेवर अभ्यास केल्यास त्या ससा कासवाचे शर्यत प्रमाणे विद्यार्थी जिंकू शकतो . प्रत्येक जण हिराच असतो पण त्या पैलू पडेतोवर घासून घ्यावे लागते . अशा अनेक दाखल्यांसह तासभर मुलांचेमध्ये उत्साह व आत्मविश्वास निर्माण केलेकारणे मुख्याध्यापक शिंदे यांनी ज्ञानेश्वर मिडगुले यांचा सत्कार केला .