शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
शिरूर तालुका भाजप अनुसूचित जाति मोर्चाच्या उपाध्यक्षपदी शिक्रापूर येथील मारुती रणबावळे यांची निवड करण्यात आली आहे. अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिलीप शेलार यांनी रणबावळे यांना नियुक्तीपत्र दिले आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते रणबावळे यांना नियुक्तीपत्र समारंभपूर्वक देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख धर्मेंद्र खांडरे, शिरूर तालुका भाजपचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिलीप शेलार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान शेळके, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहित खैरे, शिरूर तालुका कामगार आघाडीचे अध्यक्ष बाबासाहेब दरेकर, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर नवनाथ भुजबळ, हर्षद जाधव, आदी उपस्थित होते,