सुनील भंडारे पाटील
वीज आणि डिझेल समृद्ध गाव संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी गाव पातळीवर मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून सेंद्रिय करंज लागवड अभियान सुरू करण्यात आले आहे
या अभियानाचे उद्घाटन ग्राम पंचायत दरेकरवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी आयुक्त आदरणीय श्री पांडुरंग वाठारकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले .या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत डोंगर उतारावर रस्त्याच्या कडेला सेंद्रिय करंज लागवड करण्यास प्रेरित केले जाणार आहे..या करंज वृक्ष लागवड अभियानास पुणे जिल्हा उपाध्यक्ष सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य श्री दत्तात्रय हरगुडे पाटील तसेच शिरूर तालुका सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर चकोर साहेब, पुणे जिल्हा सरपंच सेवा महासंघ कार्याध्यक्षा प्रा सौ वंदनाताई चंद्रकांत गव्हाणे पाटील , सामाजीक कार्यकर्ते आणि आदर्श गाव समितीचे मार्गदर्शक आदरणीय श्री अण्णासाहेब पवार साहेब ,आणि राष्ट्रीय आम् आदमी पक्षाचे राज्य पदाधिकारी आदरणीय विजय कुंभार साहेब,श्री बिपिन पाटील साहेब,श्री जितेंद्र भावे साहेब ,श्री श्रीकांत आचार्य साहेब,श्री संदीप पाटील साहेब,श्री बिराजदार साहेब , श्री अभिजित मोरे साहेब ,श्री कैलास बधाने साहेब तसेच श्री बाबासाहेब चव्हाण साहेब.श्री मुजुमदार काका ,तसेच दरेकर वाडी येथील माजी उपसरपंच श्री मारुती दरेकर ,श्री शंकरराव दरेकर ,श्री रामदास जवळकर दरेकर वाडी ग्राम पंचायतच्या विद्यमान उपसरपंच माननीय सौ कमलताई दरेकर ,सौ आशाताई दरेकर ग्राम पंचायत सदस्य आणि अनेक शेतकरी उपस्थित होते.