सुनील भंडारे पाटील
जिल्हा परिषद शाळा हनुमान वाडी अष्टापुर (ता हवेली) येथे विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांचे स्वागत,
इयत्ता पहिली मधील प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला, यावेळी मुलांना गोड जेवण, स्वागत चिन्ह, नवीन गणवेश, पुस्तके व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला, पालकांच्या उपस्थितीत सात दुकानांवरील कृती नोंदी, शाळा विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, भाषा विकास, गणन पूर्व तयारी इत्यादी नोंद घेण्यात आली, तसेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तक वाटप करण्यात आले, या कार्यक्रमासाठी सरपंच रामदास पाटीलबुवा कोतवाल, शाळा समिती अध्यक्ष संदीप कोतवाल, विशाल कोतवाल, सचिन कोतवाल, गणेश कोतवाल, सुहास कोतवाल, श्रीकांत पानसरे, विलास कोतवाल, राहुल कोतवाल, सूर्यकांत कोतवाल, अश्विनी कोतवाल, माधुरी कोतवाल, रूपाली कोतवाल, पूजा कोतवाल, सुषमा कोतवाल, शारदा कोतवाल, आशा कोतवाल व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,