शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिक्रापूर (चाकण रोड) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत
कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दीन साजरा
करण्यात आला.
कृषि विभागाच्या वतीने राज्यभर शनिवार (दि.२५ जून) ते शुक्रवार (दि. १जुलै) ह्या सप्ताहात कृषि विभागाचे विविध तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहचिण्यासाठी सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज महिला कृषि तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी शिरीष भरती यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या विविध योजना महाडीबीटी, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, पी एफ एम ई योजना, पीक विमा तसेच बियाणे बीजप्रक्रिया, पेरणी करताना खताचा वापर, सुपिकता निर्देशकानुसार खत वापर ,नॅनो युरियाचा वापर, तणाचे नियंत्रण अशा विविध योजनांची माहिती शिरीष भरती यांनी दिली.कृषि सहाय्यक अशोक जाधव यांनी बाजरी बीज प्रक्रिया करून दाखविली. रिसोर्स पर्सन नंदा पांडुरंग भुजबळ यांच्या घरी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिक्रापूर व राऊतवाडी येथील बहुसंख्य महिला शेतकरी उपस्थित होत्या. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी कृषी मित्र तानाजी राऊत यांचे सहकार्य लाभले. कृषि पर्यवेक्षक सुनील मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.