शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
मुखई येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक-माध्यमिक आश्रम
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू
रेश्मा पुणेकर यांचे शालेय खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
मुखई (ता.शिरूर) येथील पलांडे आश्रम शाळेत शैक्षणिक वर्ष २०२२-२३
या शैक्षणिक वर्षातील बेसबॉल व सॉफ्टबॉल खेळाच्या सरावाला सुरुवात
करण्याकरिता व मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू रेश्मा
पुणेकर त्यांच्यासमवेत मॉर्डन कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर संतोष तांबे,
मार्गदर्शक शुभम मुके , ज्ञानेश्वर काळे व शिरूर तालुका क्रीडा शिक्षक
संघटनेचे कार्याध्यक्ष किरण झुरंगे हे उपस्थित होते. याप्रसंगी
आंतरराष्ट्रीय खेळाडू रेश्मा पुणेकर यांच्या हस्ते खेळाच्या साहित्यांचे
पूजन करण्यात आले व बेसबॉल खेळाच्या सरावाला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी प्राथमिक आश्रमशाळेचे क्रीडाशिक्षक विष्णू सांगळे यांच्या हस्ते
रेश्मा पुणेकर यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक
प्रशालेचे प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी केले तर माध्यमिक आश्रमशाळेचे
क्रीडा शिक्षक मनोज धिवार यांनी सूत्रसंचालन केले.